नागपुरातील बैठकीत पुन्हा खडाजंगी; भाजप उमेदवारांची यादी जाहीर होणार?

January 17, 2026 by Prakash Hande

BJP internal conflict : चंद्रपूर २८ डिसेंबर - १५ जानेवारीला होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष तयारीला लागलेले आहे, नामनिर्देशन अर्ज भरण्यासाठी दीड दिवसाचा कालावधी शिल्लक असताना अद्यापही कांग्रेस व भाजपने उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. भाजपच्या गोटात मुनगंटीवार-जोरगेवार वाद मनपा जागेवरून विकोपाला जात असल्याचे चित्र आहे. नागपुरातील भाजप कार्यालयात आज झालेल्या बैठकीत मुनगंटीवार-जोरगेवार यांच्यात चांगली खडाजंगी उडाल्याची माहिती आहे. (चंद्रपुरात शिवसेना-वंचित आघाडी मध्ये युती,६६ जागा लढणार)

चंद्रपूर महानगरपालिकेच्या १७ प्रभागातील ६६ जागेसाठी भाजपकडे तब्बल ६०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मुनगंटीवार समर्थक व जोरगेवार समर्थक यांनी निवडणूक निरीक्षक माजी खासदार संचेती यांच्या समक्ष मुलाखती दिल्या. मात्र आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळावी अशी भूमिका पहिल्या दिवसापासून मुनगंटीवार-जोरगेवार यांची आहे त्यामुळे दोघांच्या वादात अद्यापही भाजप उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली नाही.

२८ डिसेंबर रोजी नागपुरातील भाजप कार्यालयात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थिती मध्ये आमदार मुनगंटीवार व आमदार जोरगेवार यांच्यातील वाद शमविण्यासाठी निर्णायक बैठक घेण्यात आली, पण आपल्या पदरात समर्थकांना उमेदवारी मिळायला हवी यासाठी दोन्ही नेत्यांनी ताकद लावली, त्यामुळे या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. BJP internal conflict

भाजपच्या बैठकीत अंतिम तोडगा निघाला नसल्याने उमेदवारांबाबत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अंतिम निर्णय घेणार असून २९ डिसेंबर रोजी भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर करीत त्यांना AB फॉर्मचे वाटप करण्यात येणार आहे, सायंकाळी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर होणार आहे.

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या वादात कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहे, आधीच नगरपरिषदेवर कांग्रेस पक्षाने निवडणुकीत मजल मारली असताना मनपा भाजपच्या हातून जाऊ नये व नेत्यांचा वाद लवकर मिटावा अशी इच्छा कार्यकर्त्यांची आहे.

Leave a Comment

+