Congress Leader Joins Shiv Sena : चंद्रपूर १ जानेवारी - चंद्रपूर मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत दररोज राजकारणात मोठा बदल बघायला मिळत आहे, शहरातील प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट मध्ये आज कांग्रेसला मोठा धक्का पोहोचला आहे ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २५ वर्षांपासून कांग्रेस पक्षात कार्यरत सायराबानो काजी यांनी आज शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. (जटपुरा प्रभागात राजकीय समीकरणे बदलली, शिवसेना ठाकरे पक्ष मजबूत)
१५ जानेवारीला चंद्रपूर मनपा निवडणूक होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी आपली मोर्चेबांधणी व प्रचाराला सुरुवात केली आहे. पण या रणधुमाळीत कांग्रेस व भाजप पक्षात उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे या गोंधळाचा इतर पक्षांना लाभ होणार असे चित्र निर्माण झाले आहे.
वर्ष २०१७ मध्ये प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट मधून सायराबानो काजी यांनी मनपा निवडणूक कांग्रेस पक्षातर्फे लढविली होती, त्यांचा पराभव झाला मात्र त्यांनी त्या निवडणुकीत तब्बल २ हजारांच्या वर निर्णायक मते घेतली होती. निवडणूक हरल्यावर सायराबानो काजी यांनी समाजसेवेत व पक्षात रमल्या. पुढच्या वेळेस निवडणूक अधिक ताकदीने लढू असा निर्धार त्यांनी केला होता.
८ वर्षांनी चंद्रपूर मनपा निवडणूक होउ घातलेली आहे, कांग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या, नियमाप्रमाणे सायराबानो काजी यांनी मुलाखत दिली, कांग्रेस गोटातून त्या मजबूत दावेदार होत्या, मात्र ऐनवेळी कांग्रेसने त्यांना तिकीट नाकारली, २५ वर्षे पक्षाला दिली आणि पक्षाने आपला घात केला, सायराबानो यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. Congress Leader Joins Shiv Sena
२ जानेवारीला उमेदवारी अर्ज वापस घेण्याची वेळ असताना सायराबानो यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत प्रभाग क्रमांक ७ मधील शिवसेनेच्या मनस्वी गिर्हे, आकाश साखरकर, तन्वीर बशीर शेख व श्वेता तोतडे यांना जाहीर पाठिंबा दिला. सायराबानो यांनी आपली प्रतिक्रिया दिली कि मी २५ वर्षे कांग्रेस पक्षात काम केलं, दोनवेळा निवडणुकीत मी निर्णायक मते घेतली होती, मात्र यावर्षी कांग्रेसला प्रभाग क्रमांक ७ मध्ये पोषक वातावरण असताना माझी उमेदवारी नाकारली, आणि जे पक्षात सक्रिय नाही त्यांना उमेदवारी दिली. त्यामुळे आज कांग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत मी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश करीत विकासाची मशाल पेटविणाऱ्या उमेदवारांचा प्रचार करीत त्यांना विजयी करणार. २ जानेवारीला सायराबानो काजी आपला उमेदवारी अर्ज परत घेणार आहे.
पक्षप्रवेश सोहळ्यात परिसरातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
Leave a Comment