Kishor Jorgewar BJP Chandrapur program : भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाकडून प्रत्येक आमदारांना आपल्या मतदारसंघात कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar)यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन कन्यका सभागृहात केले आहे. या कार्यक्रमाला माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) उपस्थित राहणार का, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
मराठीचा अपमान खपवून घेणार नाही - मनोज तांबेकर
विशेष म्हणजे, चंद्रपूर मतदारसंघात भाजपचे दोन गट सक्रिय असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. याचाच प्रत्यय भाजपच्या स्थापना दिनानिमित्त पुन्हा एकदा आला आहे. स्थापना दिन साजरा करण्यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी वाचनालयात पक्ष प्रवेश कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तर आमदार किशोर जोरगेवार यांनी श्री माता कन्यका सभागृहात भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ज्येष्ठ नेत्या शोभा फडणवीस यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती राहणार आहे. विशेष म्हणजे, सुधीर मुनगंटीवार यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. त्यामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Leave a Comment