ऐनवेळी नगरसेवक 'नॉट रिचेबल' अन् भाजपचा महापौर!, वंचित आघाडीची कारवाई

February 10, 2026 by Prakash Hande

Chandrapur VBA Body Dissolved : चंद्रपूर - चंद्रपूर शहर महानगरपालिका महापौर व उपमहापौर निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या भूमिकेने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे, यावर पक्षाने कारवाई करीत स्नेहल रामटेके यांची पूर्ण कार्यकारणी बरखास्त केली आहे, असे पत्र आज पक्षाने जारी केले. (चंद्रपूर भाजपचे किंगमेकर)

 

चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत कांग्रेस पक्षाला २७, भाजप २३, शिवसेना ६, वंचित आघाडी २, जनविकास सेना ३, अपक्ष २, बसपा १, शिंदेसेना १ व AIMIM १ जागा मिळाल्या, शिवसेना व वंचित आघाडीने चंद्रपुरात युती करीत निवडणूक लढली होती, त्यामुळे दोन्ही पक्षाने गट स्थापन केला. ३४ हा जादुई आकडा एकही पक्षाला न मिळाल्याने शिवसेना व वंचित आघाडीचे नगरसेवक हे खरे सत्तास्थापनेत किंगमेकर ठरणार होते. मात्र आज झालेल्या निवडणुकीत ठाकरे सेनेने भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. वंचित आघाडीचे दोन्ही नगरसेवक या निवडणुकीत अनुपस्थित राहिल्याने भाजपचा महापौर १ मताने निवडून आला.

 

मनपा नगरसेवक निवडून आल्यावर वंचित व शिवसेनेचे नगरसेवक एकत्र होते, या काळात त्यांनी वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत आपली भूमिका जाहीर केली होती, काही करा पण भाजपसोबत जायचे नाही अशी भूमिका पक्षाने घेतली होती. १० फेब्रुवारीला महापौर निवडणुकीत सकाळपर्यँत वंचीत चे शहर अध्यक्ष स्नेहल रामटेके यांनी आम्ही कांग्रेस पक्षासोबत जाणार अशी भूमिका त्यांनी घेतली होती, मात्र ऐनवेळी दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

 

यावर वंचित आघाडीचे राज्य पदाधिकारी कुशल मेश्राम यांनी माहिती दिली कि, पक्षाने भाजपसोबत न जाण्याची भूमिका घेतली होती, विशेष म्हणजे महापौर व उपमहापौर निवडणूक दरम्यान आम्ही शहर अध्यक्ष रामटेके यांच्यासोबत संपर्क केला, त्यावेळी त्यांनी आम्ही कांग्रेस सोबत जाणार असे सांगितले होते, मात्र ऐनवेळी त्यांची भूमिका बदलली आणि मतदानाला दोन्ही नगरसेवक अनुपस्थित राहिल्याने भाजपचा महापौर व उबाठा चा उपमहापौर विजयी झाले. हि बाब पक्षाला खटकणारी आहे, त्यामुळे वरिष्ठ पदाधिकारी यांच्या निर्णयाने चंद्रपूर शहर वंचित आघाडीची पूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्यात आली. Chandrapur VBA Body Dissolved

चंद्रपूर वंचित आघाडी कार्यकारणी बरखास्त केल्याने पक्षाच्या निर्णयाचे अनेक कार्यकर्त्यांनी स्वागत केले आहे, आता शिवसेना उबाठा च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांवर पक्ष काय भूमिका घेतो यावर सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

+