AAP development model : चंद्रपूर ११ डिसेंबर २०२५ (News३४) - चंद्रपूर नगरपरिषद नंतर वर्ष २०१२ मध्ये महानगरपालिका अस्तित्वात आली मात्र या काळात चंद्रपूर महानगरातील नागरिकांनी कांग्रेस व भाजपची सत्ता भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेली बघितली मात्र आता नागरिकांनी आगामी मनपा निवडणुकीत आम आदमी पक्षाला साथ द्यावी असे आवाहन आपचे जिल्हाअध्यक्ष मयूर राईकवार यांनी पत्रकारी परिषदेद्वारे केले आहे. (हे हि वाचा - दारू दुकानाला परवाना देताना लोकसंमती बंधनकारक करा - आमदार जोरगेवार)
नव्या वर्षातील जानेवारी महिन्यात चंद्रपूर मनपाच्या निवडणुका होणार आहे, यासाठी सध्या सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे, मात्र यंदा आम आदमी पक्षाने प्रस्थापित पक्षांना आव्हान देण्याची तयारी केली असून त्यांनी पत्रकार परिषदेत चंद्रपूर मनपा मध्ये आप ची सत्ता आल्यावर नागरिकांनी कधी न बघितलेला चंद्रपूर निर्माण करण्याचा संकल्प म्हणजेच विकासाची गॅरंटी जाहीर केली आहे. AAP development model
चंद्रपूर मनपाचे बजट ४५० कोटी रुपये आहेत मात्र त्यामानाने शहराचा विकास झालाच नाही, कांग्रेस भाजपच्या काळात शासकीय शाळांची संख्या कमी झाली, खासगी शाळांचे जाळे वाढले. आरोग्यासाठी खासगी रुग्णालयावर नागरिक अवलंबून आहे, रस्ते व नाले निकृष्ट दर्जाचे, आजही पाणी पुरवठा नियमित होत नाही. मात्र आप ने सत्ता आल्यावर शहरात मूलभूत गरज लक्षात घेत विकास करणार असल्याची ग्वाही दिली.
शहरातील प्रत्येक झोनमध्ये जागतिक दर्जाच्या शाळेची उभारणी, शिक्षण पूर्णतः मोफत आणि जागतिक दर्जाचे, AI तंत्रज्ञान युक्त अत्याधुनिक शाळा, शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी शिक्षकांना परदेशी प्रशिक्षण दौरे.
चंद्रपूर मनपाच्या प्रत्येक झोनमध्ये अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज नवीन रुग्णालयाची निर्मिती. मनपाच्या वतीने मोफत तपासणी, उपचार आणि औषधे. गरज भासल्यास खासगी रुग्णालयात मनपाच्या खर्चाने उपचार. मनपा क्षेत्रातील नागरिकांना उपचारासाठी पैसे लागणार नाहीत.
पाणी पूर्णतः मोफत मिळणार, जुन्या थकीत पाणी बिलांची संपूर्ण माफी, प्रत्येक घरात स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा.
रस्ते नाल्याना २० वर्षाची लेखी हमी, एकदा रस्ता पूर्ण झाला तर पुढील २० वर्षे त्या रस्त्यावर खोदकाम होणार नाही. खड्डेमुक्त, टिकाऊ व दर्जेदार रस्त्यांची हमी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई व काळ्या यादीत समावेश करणार.
भाजप व कांग्रेसने चंद्रपूर मनपामध्ये सत्तेत आल्यावर फक्त भ्रष्टाचार करण्याला प्रथम प्राधान्य दिले मात्र नागरिकांच्या हिताचे काम केले नाही, याकरिता जनतेने आम्हाला संधी द्यावी असे आवाहन मयूर राईकवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. सध्या आम आदमी पक्षाचे २२ उमेदवार मनपा निवडणुकीसाठी सज्ज आहे. महानगरातील आमच्या विकास व्हिजन वर जे पक्ष सहमत असतील आम्ही त्यांच्यासोबत युती करू अशी माहिती राईकवार यांनी दिली.
आयोकीत पत्रकार परिषदेत आपचे राज्य पदाधिकारी सुनील मुसळे, राजू कुडे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Comment