Child Kidnapping Case : चंद्रपूर - बल्लारपूर शहरातून ३ वर्षीय बालकाचे अज्ञाताने अपहरण केल्याची घटना २८ फेब्रुवारीला उघडकीस आली, स्थानिक गुन्हे शाखा व बल्लारपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत २४ तासाच्या आता बाळ चोरणाऱ्या टोळीला अटक करीत अपहृत बाळाला आई-वडिलांकडे सुपूर्द करण्यात आले. चंद्रपूर पोलिसांनी अवघड या गुन्ह्याचा छडा तात्काळ स्वरूपात लावल्याने पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे. (राजुऱ्यात वाळू तस्करांची मुजोरी, वनरक्षकाला जीवे मारण्याची धमकी)
२८ फेब्रुवारीला बल्लारपूर शहरातून ३ वर्षीय मुलगा सूर्या कुंजाम ला अज्ञात इसमाने अपहरण केल्याची घटना घडली, याबाबत २७ वर्षीय सीमा राजेंद्र कुंजाम यांनी बल्लापूर पोलिसात तक्रार दिली, सूर्या चे आईवडील मजुरी चे काम करतात, त्यांना १ मुलगा सुर्या व ६ महिन्याची सोनाक्षी नामक मुलगी आहे. नेहमीप्रमाणे जेवण करून कुंजाम कुटुंब एका शेडमधील ओट्यावर झोपी गेले होते. २८ फेब्रुवारी मध्यरात्री ३ वाजताच्या दरम्यान अज्ञाताने सूर्या कुंजाम ला सोबत नेत पळ काढला. मात्र हा गुन्हा घडताना एका नागरिकाने बघितले आधी त्या सजग नागरिकाला वाटले कि रेल्वे मधील लोहा चोरी करण्यासाठी चोर आले, मात्र दुसऱ्या दिवशी पोलीस आल्यावर त्यांना सदर प्रकरण समजले.
त्या सजग नागरिकाने डोळ्यादेखत घडलेली घटना सांगितली, मध्यरात्री एक चारचाकी वाहन त्याठिकाणी उभे होते व एकाने एक बाळ त्या वाहनात घेऊन जात पळ काढला. पोलिसांना महत्वाची माहिती मिळाली आणि स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी ७ पथके तयार करीत तब्बल १०० सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. चारचाकी वाहनांची ओळख पटल्यावर वेगवेगळ्या मार्गावर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. अपहरणकर्त्यांनी वाटेत असलेल्या एका हॉटेलमध्ये बिर्याणी खाल्ली आणि पैसे हे ऑनलाईन पद्धतीने पाठविले.
पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात करीत आरोपीचा शोध घेतला असता तेलंगणा राज्यातील ६० वर्षीय एलक्का रायसिंग बुददे, ३० वर्षीय राणी विनोदकुमार पसनोटी, ४० वर्षीय संगीता व्यंकटेश पानगणती सर्व राहणार मंचेरियल यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि मंचेरियल जिल्ह्यातील मंथनी गावातील एका महिलेला ते बाळ ३ लाख ५० हजार रुपयांना विकले. Chandrapur Police Success
पोलिसांनी आरोपीसह मंथनी गाव गाठले त्याठिकाणी ५० वर्षीय सातक्का चंद्रया करेरे व ३४ वर्षीय लावण्या कुमारस्वामी कोणा यांना ताब्यात घेत अपहृत बाळ सूर्या ला सोबत घेत त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. मंथनी मधील महिलेला १२ वर्षांपासून मुलंबाळं होत नसल्याने त्यांनी सदर बाळ विकत घेतल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
या प्रकरणातील २ आरोपी ज्यांनी बल्लारपुरात सूर्या कुंजम या बाळाच्या हालचालीवर लक्ष ठेवले होते, आणि त्याबाबत संपूर्ण माहिती त्यांचा दिनक्रम लक्षात ठेवत अपहरण घडवून आणले, त्या दोघांचा शोध चंद्रपूर पोलीस घेत आहे. बल्लारपूर पोलिसात सूर्या या बाळाच्या अपहरणाची तक्रार मिळाल्यावर आधी ह्युमन ट्रॅफिकिंग चे प्रकरण वाटले मात्र पोलिसांच्या तात्काळ प्रतिसादाने अवघ्या २४ तासाच्या आत सुर्या हा आपल्या आईच्या कुशीत परत आला. आरोपींनी यापूर्वी असे गुन्हे केले आहे का? याबाबत अधिक तपास सुरु आहे.
सादरही महत्वाची व यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमाक्का सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, परिविक्षाधीन सहायक पोलीस अधीक्षक गौरव कायंदेपाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात अमोल काचोरे, बिपीन इंगळे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सपोनि दीपक कांक्रेडवार, बलराम झाडोकार, पोउपनि अभिषेक जंगमवार, पोउपनि विक्की लोखंडे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी धनराज करकाडे, संतोष दांडेकर, मोहन निषाद, प्रवीण निकोडे, किशोर वैरागडे, इम्रान खान, अजय बागेसार, दीपक डोंगरे, गजानन मडावी, हिरालाल गुप्ता, शेखर माथनकर, शशांक बदामवार, किशोर वाकाटे, अनिता नायडू, तेलंगणा पोलीस दलातील पोलीस उपयुक्त ए. भास्कर, सहायक पोलीस उपायुक्त आर प्रकाश, प्रमोद राव, उपेंद्र, दशरथ यांनी केली.
Leave a Comment