सट्टेबाजांचे धाबे दणाणले! राजुऱ्यात हायस्कूलसमोर सुरू असलेल्या खेळाचा पोलिसांनी केला 'गेम'.

February 24, 2026 by Prakash Hande

T20 Betting Arrest : राजुरा (जि. चंद्रपूर)पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत सुरू असलेल्या T-20 वर्ल्ड कपमधील झिम्बाबे विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या दोन युवकांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली आहे. दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी गोपनीय माहितीच्या आधारे ही धाड टाकण्यात आली. (चंद्रपुरात सट्टेबाजाला अटक)

 

स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने महात्मा फुले हायस्कूल, राजुरा गेटसमोर छापा टाकला असता श्रेयस पंढरी सातपुते (वय 19, रा. जवाहर नगर, राजुरा) हा आपल्या मोबाईलवर झिम्बाबे विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आला. पुढील तपासात या प्रकरणात सुजल मुक्तेश्वर वाढई (वय 21, रा. देशपांडे वाडी, राजुरा) याचाही सहभाग उघड झाला.

 

गुन्हा नोंद

या प्रकरणी पोलीस स्टेशन राजुरा येथे अपराध क्र. 281/26 अन्वये कलम 12(A) महाराष्ट्र जुगार कायदा सह कलम 49 BNS अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

जप्त मालमत्ता

  • 60,000 रुपये किंमतीचे दोन मोबाईल फोन

  • ऑनलाइन जुगारासंदर्भातील स्क्रीनशॉट पुरावे
    एकूण जप्त मालमत्ता किंमत : 60,000 रुपये

ही कारवाई उपविभाग राजुरा-गडचांदूर पथक व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या संयुक्त पथकाने केली.

 

सट्टेबाजांवर पोलिसांची करडी नजर

गेल्या काही दिवसांत T-20 वर्ल्ड कप सामने सुरू असताना ऑनलाइन सट्ट्याचे प्रमाण वाढल्याची माहिती पोलिसांना मिळत आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सट्टेबाजांवर विशेष लक्ष ठेवले असून, अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. T20 Betting Arrest

ऑनलाइन जुगार व सट्टा हा कायद्याने गुन्हा असून, अशा प्रकारे सामन्यांवर पैज लावणाऱ्यांवर पोलिसांची नजर कायम राहणार असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे.

Leave a Comment

+