tiger attack Chandrapur 2025 : चिमूर:- शंकरपूर पासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लावारी येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची घटना गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली, विद्या कैलास मसराम वय 42 असं मृतक महिलेचे नाव आहे ही घटना चिमूर वनपरिक्षेत्र भिसी उपवन क्षेत्रातील गडपिपरी बिटात घडली. विशेष बाब म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात आतपर्यंत तब्बल ३१ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेला आहे, ज्यामध्ये २९ वाघाच्या हल्ल्यात, १ अस्वल व १ हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.
ब्रह्मपुरीमध्ये वाघाचा हल्ला, गुराखी ठार
लावारी मध्ये मसराम यांनी धानाची शेती ठेक्याने घेतली आहे, मागील २ दिवसापासून शेतात निंदनाचे काम सुरु होते, आज सकाळी सहा महिला शेतात निंदनासाठी गेल्या होत्या, ५ महिला वेगळ्या दिशेने तर विद्या मसराम हि दुसऱ्या बाजूस निंदण करीत होती. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने विद्या वर हल्ला करीत तिला फरफटत नेत ठार केले.
महिलेचा पती विद्या ला बघण्यासाठी शेतात आला तेव्हा ती कुठे आढळून आली नाही, त्यावेळी मागील बांधीत विद्याचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत होता, काही अंतरावर गावकर्यांना वाघ दिसला मात्र त्यांच्या आरडाओरडाने वाघ पळून गेला. जोपर्यंत महिलेच्या पतीला नोकरी, दहा लाख रुपये व वाघाचा बंदोबस्त करणार नाही तोपर्यंत कुणाचेही वाहन जाऊ देणार नाही अशी भूमिका गावकर्यांनी घेतली. Wild Animal Terror
वनविभाग व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र गावकऱ्यांचा रोष वाढल्याने घटनास्थळी चांगलाच तणाव निर्माण झळा होता, यावेळी वनरक्षक बोरकर यांच्या दुचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. वनरक्षकाची तात्काळ बदली करावी अशी मागणी गावकरी करीत होते. यावेळी पोलीस व ववनविभागाने गावकर्यांना लेखी आश्वासन दिल्यावर तणाव शांत झाला. वन विभागातर्फे वनपरिक्षेत्र अधिकारी किशोर देऊळकर व त्यांचे कर्मचारी उपस्थित होते तर पोलीस विभागातर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगडे, पोलीस उपनिरीक्षक रवी वाघ, थूटे चिमूर व भिसी येथील पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Comment