LCB raid ND Hotel Chandrapur - चंद्रपूर – चंद्रपूर-नागपूर मार्गावरील प्रसिद्ध एनडी हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. २७ एप्रिल) रात्री अचानक धाड टाकली. या कारवाईत तब्बल ३ लाख १० हजार ६१० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून, दहा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, यापूर्वीही या हॉटेलमध्ये जुगार अड्डा उघडकीस आला होता. त्यामुळे एनडी हॉटेल वारंवार गैरकृत्यांसाठी चर्चेत राहिले आहे. ND Hotel gambling raid Chandrapur
माथाडी कामगार मंडळाचे सदस्य व्हायचंय तर आजच अर्ज करा
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अशी आहेत: समीर अराडे, दिलीप जेठानी, उमेश खाटे, योगेश्वर पंडित, प्रभाकर येनगंदेलवार, गोवर्धन चंदेल, हमीद शरीफ, भोला दास, शिवम हसानी आणि संतोष आंबे.
स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एनडी हॉटेलच्या रूम क्रमांक ११२ मध्ये काही इसम ५३ ताश पत्त्यांचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. त्यानुसार, एलसीबीच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली. जुगाऱ्यांकडून रोकड जप्त करण्यात आली असून, सर्व आरोपींविरुद्ध रामनगर पोलिस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार अधिनियम १८८७ चे कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Illegal gambling Chandrapur latest news
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईमध्ये एपीआय बलराम झाडोकार, पीएसआय संतोष निंभोरकर, जय सिंह, चेतन गज्जलवार, प्रशांत नागोसे, शशांक बादामवार, मिलिंद जांभुळे, नितीन रायपुरे आणि किशोर वाकाटे यांचा समावेश होता.
एनडी हॉटेल हे विविध कारणांसाठी नेहमीच चर्चेत राहिले आहे. यापूर्वीही याच हॉटेलमध्ये जुगार अड्ड्यांवर कारवाई झाली होती. त्यामुळे या हॉटेलवर पोलिसांचे बारकाईने लक्ष असून, हॉटेलच्या व्यवस्थापनाची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Comment