student dies । 🛑 "१५ वर्षीय विद्यार्थ्याचा चिमढा नदीत बुडून मृत्यू – पावसाळ्यातील आनंद ठरला जीवघेणा!"

January 17, 2026 by Prakash Hande

student dies in river while swimming : सावली - २८ जुलै २०२५]: सावली तालुक्यातील चिमढा नदीत बुडून सोहम प्रमोद मोहूर्ले (वय १५) या शाळकरी विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत फिरायला गेलेल्या सोहमचा नदीत आंघोळीसाठी उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने तो वाहून गेला. ही घटना सावलीतील प्रभाग क्रमांक ९ मध्ये घडली असून, सोमवारी सायंकाळी त्याचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

राजुरा शहरात पुन्हा तलवार जप्त, दोन दिवसात दोन कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, सोहम मोहूर्ले, जो इयत्ता दहावीत शिकत होता, रविवारी कुटुंबीय घरी नसताना आपल्या मित्रांसोगट फिरायला गेला होता. फिरत असताना वाटेत चिमढा नदीवरील बंधारा पाहण्याची त्याला इच्छा झाली. बंधाऱ्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू असताना सोहमला पोहण्याचा मोह आवरता आला नाही. सोबत असलेले मित्र लहान असल्याने त्याला रोखू शकले नाहीत. पोहण्याच्या इच्छेने त्याने पाण्यात उडी घेतली, मात्र पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो प्रवाहात वाहून गेला.

 

ही घटना सोहमच्या मित्रांच्या डोळ्यासमोरच घडली, परंतु भीतीपोटी त्यांनी तातडीने घरच्यांना किंवा पोलिसांना माहिती दिली नाही. रात्री उशीरपर्यंत सोहम घरी परत न आल्याने घरच्या मंडळींची चिंता वाढली. त्यांनी शोधाशोध सुरू केली असता, मित्रांकडून सत्य परिस्थिती समोर आली. मात्र, तोपर्यंत बराच उशीर झाला होता.

माहिती मिळताच पोलीस विभाग आणि आपत्कालीन मदत विभागाने तातडीने शोधमोहीम राबवली. अखेर, दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, घटनास्थळापासून काही अंतरावर सोहमचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण सावली तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

Somayya institute of technology

पोलिसांचे आवाहन

सावली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या दुर्दैवी घटनेनंतर सावली पोलिसांनी नागरिकांना वाहत्या पाण्यापासून सावध राहण्याचे आणि विशेषतः पावसाळ्यात नद्यांमध्ये न उतरण्याचे आवाहन केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना अशा धोक्याच्या ठिकाणी जाण्यापासून रोखावे, असे आवाहनही पोलिसांनी केले आहे. 

Leave a Comment

+