बल्लारपूर शहरात १९ वर्षीय युवकाकडे आढळली पिस्टल सह जिवंत काडतुसे

March 09, 2026 by Prakash Hande

Ballarpur Crime News : बल्लारपूर (चंद्रपूर) - सध्या नवतरुणांना आपल्या जवळ शस्त्र बाळगण्याचे फॅड लागले आहे, शस्त्र बाळगत परिसरात दहशत निर्माण होणार असे कृत्य नवतरुण करीत आहे. असाच एक दहशतीचा प्रयत्न बल्लारपूर पोलिसांनी हाणून पाडला, शहरात १९ वर्षीय युवक आपल्या जवळ देशी बनावटीचा कट्टा घेऊन फिरत होते, याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्या युवकाला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी देशी बनावटीची पिस्टल व ३ जिवंत काडतुसे जप्त केली. कारवाई दरम्यान दुसरा युवक पोलिसांना बघून पळून गेला. (चंद्रपूर जिल्ह्यात बल्लारपूर व वरोरा शहरात तलवारी जप्त)

 

बल्लारपूर शहरात २ युवक आपल्या जवळ देशी बनावटीची पिस्टल बाळगत भगतसिंग चौकात फिरत होते, पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी तात्काळ भगतसिंग चौक गाठले, पोलीस कारवाई करण्याच्या प्रयत्नात असताना एक युवक पळून गेला तर दुसरा पोलिसांच्या तावडीत सापडला.

 

युवकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव १९ वर्षीय कार्तिक उर्फ यश राकेश निषाद राहणार भगतसिंग वॉर्ड व पसार झालेल्या युवकाचे नाव मोनू निषाद राहणार भगतसिंग वॉर्ड होते. पोलिसांनी कार्तिक निषाद ची अंगझडती घेतली मात्र त्याचेजवळ पोलिसांना काहीही आढळले नाही. पोलिसांनी पिस्टलबाबत विचारले असता आरोपी कार्तिक ने माहिती दिली कि पोलीस कारवाई करणार अशी चाहूल आम्हाला लागल्याने ते पिस्टल मोनू च्या घरी लपविले अशी माहिती पोलिसांना दिली.

 

पोलिसांनी मोनू चे घर गाठत झडती घेतली असता खोलीच्या छ्तामध्ये एका पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये एक लोखंडी धातूची पिस्टल मॅगझिन्सह ३ जिवंत काडतुसे मिळून आले. ७.६५ MM बोर असलेली पिस्टल व खाली मॅगझीन किंमत २० हजार, ३ जिवंत काडतुसे किंमत ३ हजार रुपये असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

 

आरोपी १९ वर्षीय कार्तिक उर्फ यश राकेश निषाद व पाहिजे आरोपी मोनू मंजा निषाद वर भारतीय हत्यार कायदा सहकलम ३(५) अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई  चंद्रपूर पोलीस निरीक्षक बिपीन इंगळे यांच्या मार्गदर्शनात पोउपनि अभिषेक जंगमवार, पोलीस कर्मचारी संतोष पंडित, संतोष दंडेवार, पंकज शिंदे, सत्यवान कोटनाके, मोहनलाल निषाद, प्रवीण निकोडे, विकास जुमनाके, सचिन अल्लेवार, खंडेराव माने, शरदचंद्र कारुष, गुरु शिंदे, लखन चव्हाण, मिलिंद आत्राम व रुपाली माथनकर यांनी केली.        

Leave a Comment

+