घरमालक कामावर आणि चोर घरात! चंद्रपूरच्या रिद्धी नगरीत नेमकं काय घडलं?

February 25, 2026 by Prakash Hande

Chandrapur Crime News : चंद्रपूर - चंद्रपूर शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडी, दुचाकी चोरीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे, शहरात पोलिसांचा धाक राहिला कि नाही? असा प्रश्न या सतत घडणाऱ्या गुन्ह्यातून निर्माण होत आहे. चंद्रपूर शहरातील रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोसारा मध्ये दोन घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. (बहिणीने भाजी हिसकावली, भावाने केली बहिणीची हत्या)

 

फिर्यादी ५२ वर्षीय मोरेश्वर नथ्थूजी राजूरकर हे रिद्धी नगरी कोसारा मध्ये राहतात, बल्लारपुरातील अनुदानित आश्रम शाळेत ते मदतनीस म्हणून कामाला आहे. बल्लारपूरमध्ये नोकरी असल्याने पती-पत्नी गिलबिली मधील क्वार्टर मध्ये राहतात, मुलं बाळ बाहेर शिक्षण घेत आहे, त्यामुळे राजूरकर दाम्पत्य आठवड्यातून एकदा कोसारा मधील निवासस्थानी ये-जा करीत असतात.

 

१८ फेब्रुवारीला सायंकाळच्या सुमारास राजूरकर दाम्पत्य कोसारा मधील घराला कुलूप लावीत गिलबिली मध्ये गेले होते, २३ फेब्रुवारीला बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याने तुमच्या घरातील बाहेरील दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत आहे, असे फोनद्वारे सांगितल्यावर राजूरकर हे लगेच चंद्रपुरात पोहोचले. मुख्य दाराचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत, घरातील सामान अस्तव्यस्त स्थिती मध्ये दिसले, बेडरुमडमधील लोखंडी आलमारी फोडलेल्या अवस्थेत होत्या, आलमारी मधील सोन्याचे दागिने गायब होते. राजूरकर यांच्या घरातून ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने लंपास केल्याची खात्री पटल्यावर त्यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दिली. Chandrapur Crime News

 

यासह राजूरकर यांच्या घराशेजारी राहणारे यादव बारापात्रे यांच्या घरातून चांदीच्या मुर्त्या लंपास करण्यात आल्या, दोन्ही घरफोडी मध्ये ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला. रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरु केला आहे. 

Leave a Comment

+