tiger attack compensation policy Maharashtra : चंद्रपूर - मागील एक महिन्याच्या कालावधीत सिंदेवाही तालुक्यातील तेंदुपत्ता हंगामा दरम्यान वाघ हल्यात 4 जणांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनांमुळे सदर परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. अशा भयावह परिस्थितीत विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी मृतकांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना शासनाच्या वतीने मिळणारी मदत तातडीने देण्याचे आदेश दिले होते. तर आज वनविभागाच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत धनादेशाचे वितरण करण्यात आले. (MLA Vijay Wadettiwar tiger attack relief) सोबतच मानव - वन्यजीव संघर्षावर उपाययोजना यावर विस्तृत चर्चा करण्यात आली.
राजू रेड्डी गोळीबार प्रकरणी पोलिसांचा खुलासा
वनपरिक्षेत्र सिंदेवाही अंतर्गत तालुक्यातील जाटलापूर येथील शामराव अर्जुन मंगाम यांचा दि.25 एप्रिल रोजी वाघ हल्यात मृत्यू झाला होता. तर दि.10 मे रोजी मेंढामlल येथील सारिका शालिक शेंडे, कांता बुधाजी चौधरी, शुभांगी मनोज चौधरी, या तीनही महिलांचा तेंदुपत्ता संकलन करण्याकरिता गेल्या असता वाघिणीने चढविलेल्या हल्ल्यात मृत्यू झाला. सिंदेवाही तालुक्यात सलग सुरू असलेल्या मानव - वन्यजीव संघर्षावर (human wildlife conflict compensation Maharashtra) विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांनी आक्रमक भूमिका घेत नरभक्षक वाघांना त्वरित जेरबंद करून, परिसरात नियमित गस्त व अन्य उपाय योजना करण्याचे तातडीने निर्देश दिले. यावर वनविभागाने तात्काळ अंमलबजावणी करीत गेल्या 10 दिवसाच्या आत नरभक्षक वाघीण ,व तिच्या बछड्याला तसेच नरभक्षक वाघाला जेरबंद केले.
आज सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात विधिमंडळ पक्षनेते तथा लोकलेखा समिती अध्यक्ष आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाघ हल्यात मृत पावलेल्या कुटुंबीयांच्या वारसांना ध्येय असलेले एकूण 45 लक्ष रुपयांच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. (Chandrapur tiger attack relief fund) सोबतच भविष्यात मानव - वन्यजीव संघर्षाच्या घटना घडू नये याकरिता वनविभागाने ठोस पावले उचलून विशेष उपाययोजना करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांनी गेल्या दहा दिवसात वनविभागाच्या वतीने जेरबंद करण्यात आलेल्या एक मादी वाघ, बछडा व एक नरभक्षक वाघ , तसेच नियमित गस्त , व इतर उपाययोजनांबाबत समाधानकारक माहिती दिली.
याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, ब्रम्हपुरी दक्षिण वनवृत्तचे वनपरिक्षेत्र अधिकारी राम शेंडे , तालुका काँग्रेस अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रमाकांत लोधे, शहर काँग्रेस अध्यक्ष सुनील उट्टलवार, तालुका काँग्रेस सहकार क्षेत्राचे मधुकर बोरकर, माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, मेंढामाल ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष वामनराव कोकोडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्ष सीमा सहारे, नंदा नरसाळे, तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार , महेश मंडलवार ,सचिन नाडमवार, नगरसेवक पंकज नन्नेवार,श्याम छत्रवाणी, युनुस शेख, पंकज मूलकलवार व वाघ हल्ल्यातील मृतकांच्या कुटुंबीयांचे वारसदार लाभार्थी, वनविभागाची अतिशीघ्र मदत चमू, व वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Comment