चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक; कांग्रेससह भाजप युती व शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर

January 17, 2026 by Prakash Hande

Political party candidate list : चंद्रपूर ३० डिसेंबर - चंद्रपूर मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपात चांगलाच गोंधळ उडाला, भाजप व कांग्रेसने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी यादी जाहीर केल्याने चांगलाच गोंधळ इच्छुक उमेदवारांमध्ये उडाला होता. मुनगंटीवार-जोरगेवार वादात अनेक विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवारीला ब्रेक लागला. (भाजपने तिकीट नाकारले, अजय सरकार पुन्हा अपक्ष म्हणून रिंगणात)

शेवटच्या दिवशी एबी फॉर्म मिळणार या आशेने सकाळपासून ND हॉटेल मध्ये ठाण मांडले, हॉटेलमध्ये निवडणूक निरीक्षक माजी खासदार संचेती व प्रभारी अशोक नेते सह निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार हे उपस्थित होते. अनेकांना AB फॉर्म मिळाला मात्र अनेक विद्यमान नगरसेवकांच्या उमेदवारीला भाजपच्या गटबाजीने ब्रेक लागला. Political party candidate list

अश्यातच आमदार जोरगेवार हॉटेल बाहेर निघताच अनेक इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या भोवताल गराडा घातला, माजी नगरसेविका चंद्रकला सोयाम यांनी यावेळी जोरगेवार यांना उमेदवारी का नाकारली म्हणून जाब विचारला, परिस्थिती हाताबाहेर बघता जोरगेवार यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र माजी नगरसेविका काही एक ऐकायला तयार नव्हती.

कांग्रेस पक्षाने ६६ उमेदवारांची यादी जाहीर केली असून यामध्ये वडेट्टीवार-धानोरकर समर्थकांना न्याय मिळाला आहे. कांग्रेसने वादग्रस्त असलेल्याना सुद्धा पक्षाचे तिकीट जाहीर केले आहे. भाजपात आमदार जोरगेवार यांच्या समर्थकांना न्याय मिळाला असून त्यांच्या यादीत भाजप व शिवसेना उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. Political party candidate list

चंद्रपूर महानगरपालिकेत कांग्रेस ६३, जनविकास सेना ३ एकूण ६६ जागा, भाजप ५८, शिवसेना शिंदे ८, राष्ट्रवादी अजित पवार स्वबळावर ४० जागा, मनसे २५ स्वबळावर,शिवसेना-वंचित आघाडी प्रत्येकी ३३ व राष्ट्रवादी शरद पवार स्वबळावर ५५ जागा लढणार आहे.

कांग्रेसची यादी

  • प्रभाग क्रमांक १
  • देगो तुकूम - गट अ प्रतिभा विजय पेंदाम, ब गट आशिष सुधाकर बोन्डे, क गट सुवर्णा विजय लोखंडे, ड गट प्रकाश केशवराव खुटेमाटे
  • प्रभाग क्रमांक २
  • शास्त्रीनगर - अ गट अनुसया दहेगावकर, ब गट विद्या विजय ठाकरे, क गट प्रतीक्षा संदीप सिडाम, ड गट सचिन विनोद कात्याल
  • प्रभाग क्रमांक ३
  • एम.ई.एल - अ गट अतुल सुभाष वाघमारे, ब गट लोमेश उईके, क गट सुनीता सतीशबाबू अग्रवाल, ड गट शालिनी कमलेश भगत.
  • प्रभाग क्रमांक ४
  • बंगाली कॅम्प - अ गट साधना भाऊजी रामटेके, ब गट संगीता मंगल भोयर, क गट बिंदिया प्रवीण अधिकारी, ड गट अहमद मन्सूर अली.
  • प्रभाग क्रमांक ५
  • विवेक नगर - अ गट शुभम सुरेश दातार, ब गट सुनंदा दिलीप धोबे, क गट वनश्री केशव मेश्राम, ड गट अभिषेक गजानन डोईफोडे
  • प्रभाग क्रमांक ६
  • इंडस्ट्रियल प्रभाग - अ गट रिया प्रवर्तन आवळे, ब गट कलमती रामकृपाल यादव, क गट राजेश मुरली अडूर, ड गट गिरिश्चंद्र गुप्ता.
  • प्रभाग क्रमांक ७
  • जटपुरा गेट - अ गट अश्विनी निखिलेश खोब्रागडे, ब गट मनोज वासेकर, क गट मीनाक्षी संजय गुजरकर, ड गट रमीज रफिक शेख.
  • प्रभाग क्रमांक ८
  • वडगाव प्रभाग - अ गट मनीषा बोबडे (जनविकास सेना), ब गट मनोज वासेकर, क गट प्रतीक्षा अजय येरगुडे (जनविकास सेना), ड गट प्रदीप उर्फ पप्पू शंकर देशमुख (जनविकास सेना)
  • प्रभाग क्रमांक ९
  • नगिनाबाग - अ गट दिक्षा सातपुते, ब गट सुरेंद्र विठ्ठलराव अडबाले, क गट वैशाली अजय महाडूळे, ड गट स्वप्नील रमेश कांबळे
  • प्रभाग क्रमांक १०
  • एकोरी मंदिर - अ गट राहुल घोटेकर, ब गट संजीवनी वासेकर, क गट साफिया तवांगर खान, ड गट मोहम्मद सोईल मोहम्मद इस्माईल
  • प्रभाग क्रमांक ११
  • भानापेठ - अ गट शिला दत्तू सिडाम, ब गट राहुल गेंदलाल चौधरी, क गट सईदा बेगम ताजु शेख, ड गट पंकज विलासराव आईंचवार
  • प्रभाग क्रमांक १२
  • महाकाली मंदिर - अ गट करुणा शंकर चालखुरे, ब गट संगीता गोपाल अमृतकर, क गट रितेश उर्फ रामू तिवारी, ड गट संतोष लहामगे
  • प्रभाग क्रमांक १३ (बाबुपेठ) - अ गट विनोद हरिशचंद्र लभाने, ब गट छाया सुंदर खारकर, क गट ललिता राजेश रेवल्लीवार, ड गट रामनरेश कुंवरलाल यादव
  • प्रभाग क्रमांक १४ (पठाणपुरा गेट) - अ गट सीमा विनोद पाटील, ब गट वसंतराव राजेश्वरराव देशमुख, क गट वैशाली प्रकाश चंदनखेडे, ड गट सुनील गोपालदास खंडेलवाल
  • प्रभाग क्रमांक १५ (विठ्ठल मंदिर) - अ गट शोभा शरदचंद्र वाघमारे, ब गट राजू गजानन बनकर, क गट सौरभ अरुण ठोंबरे, ड गट राधा प्रफुल पुलगमकर
  • प्रभाग क्रमांक १६ (हिंदुस्थान लालपेठ) - अ गट करिष्मा बिट्टू जंगम, ब गट अनिता हनुमान चौखे, क गट चंदा मनोज वैरागडे
  • प्रभाग क्रमांक १७ (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) - अ गट आकाश मिलिंद मानकर, ब गट गुंजन किशोर येरमे, क गट महानंदा रवींद्र वाळके. Political party candidate list

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची यादी

  • प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम - अ गट शिल्पा संदीप चौधरी, ब गट राहुल बबनराव वीरूटकर, क गट श्रुती राकेश घटे, ड गट जगदीश गुलाबराव लोणकर
  • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर - ब गट मंजुषा साखरकर, क गट अमरजित कौर धुन्ना, ड गट सुरेश रामचंद्र पचारे
  • प्रभाग क्रमांक ३ एमईएल - अ गट विक्रांत विजय सहारे, ब गट राहुल विजय मडावी, क गट मालू राजेंद्र चौधरी, ड गट सदफ रिजवान खान पठाण
  • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प - ब गट सुभाष देविदास दोनोडे, क गट सुवर्णा गणेश उगेमुगे
  • प्रभाग क्रमांक ५ विवेकनगर - ब गट माया देवराव बुरडकर, क गट पूजा बंडू चौधरी, ड गट महेश प्रकाश मगरे
  • प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट - अ गट शिल्पा कांबळे, क गट हिमायून इस्त्राईल अली
  • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट - अ गट श्वेता बंडू तोतडे, ब गट आकाश चंद्रभान साखरकर, क गट मनस्वी संदीप गिर्हे, ड गट तन्वीर बशीर शेख
  • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग - ब गट सतीश मुरलीधर मालेकर, क गट दीप्ती भास्कर कुंभरे
  • प्रभाग क्रमांक १० एकोरी वार्ड - ब गट सीमा उत्तमराव बरडे
  • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ - क गट पल्लवी विनोद कार्लेकर
  • प्रभाग क्रमांक १२ महाकाली मंदिर - ड गट गणेश रामगुंडवार
  • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर - अ गट गणेश बानकर, ब गट विशाल निंबाळकर, क गट किरण कोतपल्लीवार, ड गट मुग्धा खाडे.

भारतीय जनता पार्टी व शिवसेना शिंदे पक्षाची यादी

  • प्रभाग क्रमांक १ देगो तुकूम - अ गट सरला कुळसंगे, ब अनिल पांडुरंग फुलझेले, क गट आशा मनोहर बेले, ड गट सुभाष दिनकर कासनगोट्टूवार.
  • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर - अ गट शीतल रवींद्र गुरनुले, ब गट शिवसेना पूजा शैलेश केळझरकर, क गट अनुजा सतीश तायडे, ड गट विठ्ठल डुकरे
  • प्रभाग क्रमांक ३ एमईएल - अ गट निलेश गवळी, ब गट जितेश कुळमेथे, क गट आशा देशमुख, ड गट सविता प्रलय सरकार
  • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प - अ गट जयश्री महेंद्र जुमडे, ब गट आकाश मस्के, क गट सारिका सचिन संदुरकर, ड गट रॉबिन बिस्वास
  • प्रभाग क्रमांक ५ विवेकनगर - अ गट पुष्पा संजय उराडे, ब गट अंजली शंकर घोटेकर, क गट शिवसेना प्रियांका भरत गुप्ता, ड गट संदीप किसन आवारी
  • प्रभाग क्रमांक ६ इंडस्ट्रियल इस्टेट - अ गट राजलक्ष्मी सुधीर कारंगल, ब गट सुनीता जैस्वाल, क गट महेश दशरथ झोटे, ड गट चंद्रशेखर शेट्टी
  • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट - अ गट शिवसेना भाग्यश्री हांडे, ब गट प्रमोद क्षीरसागर, क गट छबूताई वैरागडे, ड गट शिवसेना रवि आसवानी
  • प्रभाग क्रमांक ८ वडगाव - अ गट सोनल प्रकाश देवतळे, ब गट रवि जोगी, क गट राखी संजय कंचर्लावार, ड गट देवानंद वाढई
  • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग - अ गट सविता राहुल कांबळे, ब गट प्रशांत चौधरी, क गट शीतल आदे, ड गट राहुल पावडे
  • प्रभाग क्रमांक १० एकोरी - अ गट राजू येले, ब गट सरिता घटे, क गट शिवसेना इसमत रशीद हुसेन, ड गट शिवसेना शेख नासिर शेख अहमद
  • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ - अ गट शिवसेना माला पेंदाम, ब गट सूरज पेद्दूलवार, क गट आशा आबोजवार, ड गट संजय कंचर्लावार
  • प्रभाग क्रमांक १२ महाकाली - अ गट पुष्पा वामन दहेगावकर, ब गट अविता चंद्रशेखर लडके, क गट प्रज्वल कडू, ड गट राजेंद्र शास्त्रकार
  • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ - अ गट रमेश दुर्गा दुर्योधन, ब गट अश्विनी श्रीकांत पिंपळशेंडे, क गट श्रुती ठाकूर, ड गट प्रदीप किरमे
  • प्रभाग क्रमांक १४ भिवापूर - अ गट ज्योती जीवने, ब गट अमोल शेंडे, क गट वनिता आंबेकर, ड गट संतोष जिलेवार
  • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर - अ गट संगीता खांडेकर, ब गट विनोद शेरकी, क गट शिवसेना सीमा रामेडवार, ड गट भालचंद्र दानव
  • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ - अ गट कविता कनकम, ब गट ज्योती गेडाम, क कल्पना बगूलकर
  • प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर - अ गट रमेश पुलिपाका, ब गट राजू तोडसे, क गट शिवसेना प्रतिमा ठाकूर.

Leave a Comment

+