Pulkit Singh CEO Chandrapur visit : चंद्रपुर जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी नुकताच जिवती तालुक्याचा दौरा केलेला असुन, क्षेत्रीय भेटीदरम्यान जिवती तालुक्यातील विविध गावांना भेटी देवुन विविध विकास कामांची पाहणी केली आहे. Rural development in Chandrapur
चंद्रपुरातील राम बाग वाचवा, नागरिकांचा पुढाकार
मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांनी जिवती तालुक्यातील भेटी दरम्यान ग्रामपंचायत पाटण येथील आदर्श आपले सरकार सेवा केंद्रास भेट देऊन, उत्पन्नाचा दाखला वितरण करण्यात आले. व महिला बचत गटांना कर्ज मंजुरी प्रमाणपत्र देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे यांच्या हस्ते मौजा शेणगाव येथे दिड महिन्यापूर्वी घरकुलाचे भूमिपूजन करण्यात आले होते. अशा पूर्ण झालेल्या घरकुलाची पाहणी करण्यात आली. मॉडेल प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवुन, येथिल सोई सुविधांची पाहणी करण्यात आली. मॉडेल जिल्हा परिषद हायस्कूलची पाहणी करून, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले.
पीटीगुडा नं 1 येथे ऑक्सिजन पार्क, नरेगा अंतर्गत बंधारा बांधकाम , सार्वजनिक कंपोष्टपिट च्या कामांची पाहणी केली. गावात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. टेकमांडवा येथे उपआरोग्य केंद्राला भेट दिली . येथील आरोग्य विषयक सेवांची माहिती जाणुन घेतली व यंत्रणेतील अधिकारी व कर्मचा-यांना योग्य ते निर्देश देण्यात आले. जिल्हा परिषदच्या शाळेस भेट देऊन, विद्यार्थींशी हितगुज केली. Gram panchayat inspection Chandrapur
पंचायत समिती जिवती येथिल सभागृहात विविध विभागाचे अधिकारी व ग्रामपंचायत अधिकारी यांचा विविध विकास कामांचा आढावा घेऊन गाव स्तरावरील विकास कामे वेळेत पुर्ण करण्याचे यावेळी उपस्थितांना निर्देश दिले. मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिह यांच्या जिवती तालुक्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान उमेदचे प्रकल्प संचालक गिरीष धायगुडे ,जिवती पंचायत समितीचे गटविकास अधिकारी लक्ष्मीनारायन दोडके व तालुका यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Comment