Illegal weapon arrest : राजुरा - चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारी डोकावू पाहत आहे, या क्षेत्रात नवे गुन्हेगार तयार होत आहे, अश्यातच जिल्ह्यातील राजुरा शहरात एक २१ वर्षीय शिक्षण घेणारा युवक चारचाकी वाहनात तलवार घेऊन फिरत होता, पोलिसांना माहिती मिळताच त्या युवकाला ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (प्रेमसंबंधाचा संशय दिराने केली वहिनीची हत्या)
शहरात एक युवक अवैध शस्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी माहिती मिळताच पंचायत समिती चौकात धडक दिली असता त्याठिकाणी चारचाकी वाहन क्रमांक एमएच १२ FK ८८८२ ची जडतो घेतली असता कारच्या मागील डिक्कीत एक जुनी वापरती लोखंडी धारदार तलवार आढळली.
पोलिसांनी पंचनामा करीत लोखंडी तलवार जप्त करी २१ वर्षीय रितेश यशवंत सोनवणे राहणार साईबाबा वॉर्ड बल्लारपूर याला अटक करण्यात आली. बेकायदेशीरपणे शहरात दहशत माजविण्याचा उद्देशात असलेल्या त्या युवकाला काही गुन्हा घडण्यापूर्वी राजुरा पोलिसांनी रितेश सोनवणे ला अटक केली.
Leave a Comment