vikrant sahare demand for local employment । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार द्या - युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे

January 17, 2026 by Prakash Hande

vikrant sahare demand for local employment

vikrant sahare demand for local employment : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) - चंद्रपूर शहरात जानेवारी २०२६ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे, तत्पूर्वी डिसेम्बर महिन्यात भव्य अश्या कॅन्सर हॉस्पिटलचे सुद्धा लोकार्पण होणार असून या नव्या आरोग्यदायी विभागात अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. चंद्रपुरातील सुशिक्षित बेरोजगारांना या शासनाच्या प्रकल्पात रोजगार मिळावा यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

Read Also : चंद्रपुरात रस्त्यावर सुरु झाला राजकीय तमाशा

चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे, त्यासाठी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास सुरुवात झाली असून चंद्रपूर शहरातील बेरोजगार तरुण तरुणींना स्थानिकांना ८० टक्के रोजगार या नियमाच्या अधीन राहून बेरोजगारांना रोजगार द्यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

१५ नोव्हेम्बर रोजी सहारे यांनी अधिष्ठाता यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले, यावर त्यांनी सकारात्मता दर्शवित स्थानिकांना या रोजगार प्रक्रियेत सामील करणार असे आश्वासन दिले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार मिळेल अशी आशा बेरोजगारांच्या मनात निर्माण झाली आहे. या मागणीवर बेरोजगारांनी विक्रांत सहारे यांचे आभार मानले आहे.

Leave a Comment

+