चंद्रपूर - किराणा दुकानात एक व्यक्ती २० रुपयाचे कुरकुरे घ्यायला आला आणि १ लाख २० हजाराची सोन्याची चैन घेऊन पळाला, हि घटना रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून चैन हिसकावल्यावर आरोपीने साथीदारांसह पळ काढला. (दुर्गापूरात अवैध हातभट्टी पोलिसांनी केली उध्वस्त)
गजानन महाराज मंदिर रोड स्नेहनगर मधील विठ्ठल किराणा स्टोअर्स मध्ये हि घटना ९ मे रोजी घडली. सदर दुकान हे संजय सुधाकर हेडाऊ यांचे असून रात्री ९ वाजता संजय जेवण करण्यासाठी घरी गेला असता संजय ची आई ७३ वर्षीय कमल सुधाकर हेडाऊ या काही वेळासाठी दुकानात बसल्या होत्या.
या दरम्यान एक इसम दुकानात आला, त्याने कुरकुरे पॉकेट मागितले, कुरकुरे दिल्यावर त्याने २० रुपये दिले, परत त्याने चिप्स चे पॉकेट मागितले असता ते देण्यासाठी कमल हेडाऊ मागे वळल्यावर त्या इसमाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची हिसकावत तोडून पळाला.
अचानक घडलेल्या या प्रसंगाने कमल हेडाऊ यांनी आरडाओरडा केला, दुकानात आई चा आवाज आणल्याने मुलगा संजय त्याठिकाणी आला, तो त्या इसमाच्या मागे धावला, काही अंतरावर त्या इसमाचा साथीदार वाहन घेऊन असल्याने ते दोघे त्याठिकाणाहून पळाले. कमल हेडाऊ यांचा १५ ग्राम वजनाची सोन्याची चैन किंमत १ लाख २० हजार चोरून नेली.
याबाबत कमल हेडाऊ यांनी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहे.
Leave a Comment