शौचास गेल्या परतल्या नाहीत, चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा २ अल्पवयीन मुली बेपत्ता

May 25, 2026 by Prakash Hande

Missing Minor Girls : गोंडपिपरी/ब्रह्मपुरी - चंद्रपूर जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यातील गोंडपिपरी व ब्रह्मपुरी तालुक्यातील २ मुली बेपत्ता झाल्याने पालक वर्गात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. २३ मे रोजी गोंडपिपरी व २४ मे ला ब्रह्मपुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. (चंद्रपूर जिल्ह्यात पहिली मकोका कारवाई)

 

गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा मध्ये २३ मे रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास १७ वर्षीय मुलगी शौचास बाहेर जायचे म्हणून घरून निघाली, मात्र बराच वेळ झाल्याने मुलगी घरी आली नाही, त्यामुळे आईने शेजारी मुलींबाबत विचारणा केली. मात्र रात्र झाली तरी मुलगी घरी आली नाही.

 

दुसऱ्या दिवशी २४ मे ला आईने अल्पवयीन मुलीला कुणीतरी फूस लावून पळविले असल्याची तक्रार गोंडपिपरी पोलीस ठाण्यात नोंदवली, पोलिसांनी गुन्हा दाखल करताच तपास सुरु केला.

ब्रह्मपुरी तालुक्यातील १७ वर्षीय मुलगी हि घरातील व शेतात कुटुंबासमवेत काम करते, २४ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास मुलगी म्हणाली कि मला शौचास बाहेर जायचे आहे, असे म्हणत ती बाहेर गेली. मात्र बराच कालावधी लोटल्यावर मुलगी घरी न आल्याने कुटुंब चिंतेत आले.

 

मुलीची सर्वत्र चौकशी व शोध घेतला मात्र ती कुठेही आढळून आली नाही. त्यामुळे मुलीच्या आईने ब्रह्मपुरी पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाने मुलीला फूस लावून पळविले अशी तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरु केला.

Leave a Comment

+