IAS Vinay Gowda । निरोप आणि स्वागताचा सोहळा! चंद्रपूर जिल्हा प्रशासनात नवीन पर्वाला सुरुवात

April 18, 2026 by Prakash Hande

IAS Vinay Gowda Farewell : चंद्रपूर : चंद्रपूरचे माजी जिल्हाधिकारी तथा छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी विनय गौडा सर यांच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याने विकासात भरारी घेतली. त्यांच्या नेतृत्वात जिल्ह्याने अनेक पुरस्कार प्राप्त केले. गौडा सरांचा खुप अभ्यास असून प्रत्येक बाबीकडे ते अतिशय बारकाईने लक्ष देतात. नंदूरबारमध्ये त्यांच्या मार्गदर्शनात काम करण्याची संधी मिळाली. चंद्रपुरात त्यांनी चांगली टीम निर्माण केली. त्यांनी रचलेल्या पायाचा आणखी विस्तार करून चंद्रपुरला प्रगतीपथावर नेण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोतअशी ग्वाही जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी दिली. तर चंद्रपुरचे नाते आणि आठवण कायम स्मरणात राहील. येथील कार्यकाळाबद्दल आपल्याला नेहमी कृतज्ञता आणि अभिमान राहीलअशा भावना चंद्रपुरचे माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केल्या.  (चंद्रपूर जिल्ह्यात हिमयुगाचं रहस्य उलगडलं)

 

जिल्हाधिकारी कार्यालयचंद्रपुरच्या वतीने आज (दि.18) नुतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचा स्वागत समारंभ आणि माजी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना दोन्ही जिल्हाधिकारी बोलत होते.

नियोजन भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेश,  सहायक जिल्हाधिकारी लघिमा तिवारीनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारउपवनसंरक्षक योगेश वाघायेसैनिक स्कूलचे प्राचार्य अश्विनी अनुपदेव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारीसर्व तहसीलदारसर्व विभाग प्रमुख आदी उपस्थित होते.

 

14 ऑक्टोबर 2022 ला चंद्रपूर जिल्ह्यात रुजू झालोअसे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणालेपहिल्यांदा जिल्हाधिकारी होण्याची संधी चंद्रपूर जिल्ह्यात मिळाली. चंद्रपूर हा जिल्हा राज्याच्या शेवटच्या टोकावर असून विविधतेने नटलेला जिल्हा आहे. येथे खुप गोष्टी शिकायला मिळाल्या. साडेतीन वर्षाचा कार्यकाळ आपल्यासाठी अविस्मरणीय राहिला. सर्व टीम मिळून एकजुटीने जिल्ह्याच्या विकासासाठी काम केलेयाचा आनंद आहे. लोकसभाविधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडू शकलोयाचेही समाधान आहे.

 

विशेष म्हणजे टीमकडून प्रेमाने काम करून घेण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले. केवळ महसूल विभागाचेच नाहीतर सर्व विभागाचे सहकार्य आपल्याला मिळाले. चंद्रपूरचा विकास झपाट्याने होत आहे. सामान्य आणि गरजू नागरिकांचे महत्त्वाचे विषयत्यांच्या समस्या सोडविल्या तर वेगळेच समाधान मिळते. निराधार तसेच आवाज नसणाऱ्या लोकांची कामे केली त्याचा सार्थ अभिमान आहे. चंद्रपुरच्या जिल्हाधिकारी वसुमना पंत ह्या अतिशय कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या कार्यकाळात चंद्रपूरची आणखी चांगली प्रगती होईलअशी अपेक्षा जिल्हाधिकारी गौडा यांनी व्यक्त केली. Vasumana Pant IAS

 

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेशसहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारीउपवनसंरक्षक योगेश वाघायेनिवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभारतहसीलदार विजय पवारक्रीडा अधिकारी अविनाश पुंडजिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांच्यासह नायब तहसीलदार संघटनेचे राजू धांडेस्वीय सहायक विक्रांत गुप्तामहसूल कार्यकारी संघटनेचे ममता दुरटकरमंडळ अधिकारी संघटनेचे प्रवीण वरभेग्राम महसूल अधिकारी संघटनेचे विशाल चांदेकरशिपाई संवर्गातून अजय मेश्रामकोतवाल संघटनेचे दयाराम वंजारी आणि पोलीस पाटील संघटनेचे नितेश वाटोळे आदींनी मनोगत व्यक्त केले.

 कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनीसंचालन अजय मेकलकर यांनी केले.

Leave a Comment

+