Police Complaint । मुनगंटीवार संतापले! प्रदूषण मंडळाच्या मुजोर अधिकाऱ्याविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात तक्रार!

April 20, 2026 by Prakash Hande

Sudhir Mungantiwar Police Complaint : चंद्रपूर - प्रदूषणाने बेहाल झालेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुजोर अधिकाऱ्यांविरुद्ध भाजपचे जेष्ठ नेते व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली, प्रदूषणामुळे शेतकरी पूर्णतः हवालदिल झाले आहे, याकडे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने मुनगंटीवार यांनी गंभीर पाऊल उचलले आहे. (खासदार धानोरकरांचा अपमान)

 

चंद्रपूर तालुक्यातील मौजा बेलसनी या गावात महामाया इन्फ्रा डेव्हलपर्स यांनी कोल वॉशरी वर्ष २०२४ पासून सुरु केली, यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा स्तर वाढला. शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले. कापूस, सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्याने शासन नियुक्त प्रदूषण नियंत्रण शेतपिक नुकसान भरपाई समितीने याबाबत पंचनामा करीत ६८ लाख ६१ हजार ८६४ रुपयांची भरपाई निश्चित केली होती.मात्र ती अद्यापही शेतकऱ्यांना मिळाली नाही.

 

हि नुकसान भरपाई वसूल करण्याची जबाबदारी प्रादेशिक अधिकारी प्रदूषण मंडळ यादव यांच्याकडे होती, याबाबत मुनगंटीवार यांनी वारंवार पत्रव्यवहार केला, शासनाच्या वतीने सुद्धा पाठपुरावा करण्यात आला मात्र अधिकारी यादव यांनी आपले कर्तव्य पार पाडले नाही. त्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी २० एप्रिल रोजी प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी यादव यांच्याविरोधात रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, महापौर संगीता खांडेकर, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, राहुल पावडे, मंगेश गुलवाडे व ब्रिजभूषण पाझारे यांची उपस्थिति होती. 

 

Leave a Comment

+