नशेचा नवा अध्याय, अफिमपासून बनणारी 'डोडा पावडर' चंद्रपुरात, कोरपना पोलिसांनी केली कारवाई

May 19, 2026 by Prakash Hande

कोरपना (चंद्रपूर) - अफिम च्या झाडापासून तयार होणार अंमली पदार्थ डोडा पावडर कोरपना पोलिसांनी जप्त केला, कोरपना पोलिसांनी या कारवाईत तब्बल २ किलो २६७ ग्राम डोडा पावडर सह १० लाख ९ हजार ०६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (चंद्रपुरात ५ लाखांचा सुगंधित तंबाखू जप्त)

 

१८ मे रोजी कोरपना पोलिसांना काही ट्र्क चालक मोठ्या प्रमाणात डोडा पावडरची अवैध वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे कोरपना पोलिसांनी वनसडी जवळ सापळा रचला. गडचांदूर वरून हैद्राबाद च्या दिशेने जाणाऱ्या ट्र्क क्रमांक JK २१ C ४५९९ ला गडचांदूर ते कोरपना मार्गावरील वनसडी शोएब सुपर मार्केट समोर थांबविता ट्र्क ची झडती घेण्यात आली.

 

ट्र्क ची झडती घेतली असता त्यामध्ये एका पांढऱ्या बोरीमध्ये ४ हिरव्या पॉलिथिन आढळून आल्या त्यामध्ये अंमली पदार्थ डोडा पावडर २ किलो २६७ ग्राम (Poppy straw) जप्त करण्यात आला. कोरपना पोलिसांनी ड्रायवर ४० वर्षीय जसवंतलाल श्रीबिसन दास, राहणार घगवाल जम्मू काश्मीर व क्लिनर ३६ वर्षीय सोनू लवकुमार शर्मा राहणार घगवाल जम्मू काश्मीर यांना ताब्यात घेण्यात आले. 

 

या कारवाईत दोन्ही आरोपींवर NDPS ऍक्ट कलम ८(क), १५ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व यासह ट्र्क सह एकूण १० लाख ९ हजार ६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. खसखशीच्या झाडाला (Poppy plant) जे गोल फळ येते, त्याला 'डोडा' किंवा 'बोंड' (Poppy Husk) म्हणतात. जेव्हा या फळातून अफीम (Opium) काढून घेतले जाते, तेव्हा उरलेले जे सुके कवच किंवा बोंड असते, त्याला बारीक दळून त्याची पावडर तयार केली जाते. यालाच 'डोडा पावडर' किंवा 'पोपी स्ट्रॉ' म्हणतात. या पावडरमध्ये 'मॉर्फिन' (Morphine) आणि 'कोडीन' (Codeine) सारखे अंमली अंश अल्प प्रमाणात शिल्लक असतात. त्यामुळे अनेक मजूर, ट्रक ड्रायव्हर्स किंवा व्यसनी लोक थकवा घालवण्यासाठी किंवा नशेसाठी चहामध्ये किंवा पाण्यासोबत याचे सेवन करतात.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या नेतृत्वात पोउपनि देवानंद केकन, साईनाथ, नामदेव, पंढरी, रामदास, विशाल, जितेंद्र, दीपक, किशोर यांनी केली. 

 

Leave a Comment

+