Cattle Smuggling । तेलंगणात कत्तलीसाठी चालला होता गोवंश; कोरपना पोलिसांनी पहाटे उधळला डाव!

April 01, 2026 by Prakash Hande

Maharashtra Cattle Smuggling News : चंद्रपूर / कोरपना - तेलंगणा राज्यात कत्तलीकरिता गोवंश जनावरांनी भरलेली गाडी पार्डी या ठिकाणी थांबवून ठेवली होती, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जनावरांसह एका आरोपीला ताब्यात घेतले असून यावेळी एकूण ३ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (एकाच रात्री ३ दुकानात चोरी)

 

१ एप्रिल ला पहाटे ३.३० वाजता ११२ वर कॉल आला कि पार्डी या गावातील मार्गावर गोवंश जनावरांनी भरलेली गाडी थांबून आहे, माहिती मिळताच पोलीस पथक त्याठिकाणी दाखल झाले. पंचासमक्ष वाहन क्रमांक एमएच२९ बीई ६१७२ ची झडती घेतली असता त्यामध्ये ४ गाय व ४ मग कालवड गोवंशीय जनावरे आढळले, जनावरांच्या तोंडाला निर्दयतेने घट्ट बांधून ठेवले होते.

 

चालकाचे नाव विचारले असता त्याने आपले नाव ३६ वर्षीय मुन्नू अनवर शेख ओडिया मोहल्ला पलवाल हरियाणा हल्ली मुक्काम वणी जिल्हा यवतमाळ असे सांगितले. सदर जनावरे कुणाचे व कुठं नेत आहे याबाबत पोलिसांनी विचारल्यावर तो म्हणाला कि हे जनावरे युनूस यांचे असून यांना तेलंगणा राज्यातील बेला गावात कत्तलीकरिता नेत आहे. 

 

कोरपना पोलिसांनी ८ जनावर, वाहन असा एकूण ३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. युनूस चा शोध सुरु आहे.

सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक लता वाढीवे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी जितेंद्र राजूरकर, पोउपनि नैताम, विक्रम यांनी केली, पुढील तपास कोरपना पोलीस करीत आहे.

Leave a Comment

+