चंद्रपूरला मिळाल्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी; Vasumana Pant IAS यांच्या हाती जिल्ह्याची कमान

April 02, 2026 by Prakash Hande

Vasumana Pant IAS : चंद्रपूर - जिल्हाधिकारी विनय गौडा यांची २ एप्रिल रोजी बदली झाल्याने त्यांच्या जागी आता नागपूर मनपाच्या अतिरिक्त आयुक्त वसुमना पंत ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाचा आदेश जारी करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे चंद्रपूरच्या प्रथम महिला जिल्हाधिकारी असण्याचा मान श्रीमती वसुमना पंत यांना मिळाला आहे. (चारित्र्यावर संशय आणि रक्तरंजित दुर्गापूर)

 

चंद्रपूर जिल्ह्याला आजवर अनेक पुरुषी प्रधान जिल्हाधिकारी लाभले असून प्रथमच महिला अधिकाऱ्यांच्या हाती जिल्ह्याची कमान सोपविल्या जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खासदार महिला, मनपा महापौर महिला, जिल्हापरिषदेच्या अध्यक्षा सुद्धा महिलाच होणार आहे. यानिमित्ताने जिल्ह्यात प्रथमच विविध विभागाचे नेतृत्व महिला अधिकारी करणार आहे.

 

कोण आहे वसुमना पंत?

वसुमना पंत यांचा जन्म ११ जुलै १९९१ रोजी झाला असून त्या २०१७ बॅचच्या महाराष्ट्र कॅडरमधील भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत. त्यांनी University of Delhi मधून अर्थशास्त्र विषयात बी.ए. आणि एम.ए. पदवी प्राप्त केली आहे.

सध्या त्या महाराष्ट्रातील Nagpur Municipal Corporation येथे अतिरिक्त आयुक्त (Additional Municipal Commissioner) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ही जबाबदारी २ एप्रिल २०२५ रोजी स्वीकारली होती. आता त्या चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारतील.

यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), सहाय्यक कलेक्टर, सहाय्यक सचिव, अधिसंख्य (Supernumerary) सहाय्यक कलेक्टर आणि महासंचालक (Director General) अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.

वसुमना पंत या सध्या भारतीय प्रशासकीय सेवेत कार्यरत असून महाराष्ट्राच्या प्रशासनात महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.

Leave a Comment

+