Rani Hirai Jayanti । चंद्रपुरात १९ आणि २० एप्रिलला भव्य महोत्सव; असा आहे प्रशासनाचा मेगा प्लॅन!

April 15, 2026 by Prakash Hande

Rani Hirai Jayanti Update : चंद्रपूर - राजमाता राणी हिराई जयंती महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. या बैठकीत आ. जोरगेवार यांनी महोत्सवाच्या नियोजनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच संबंधित विभागांना आदिवासी सामाजिक संघटनांचा सहभाग घेऊन महोत्सव साजरा करण्याच्या सूचना यावेळी दिल्या. (खासगी शाळांची मक्तेदारी थांबणार)

 

यावेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, मनपा आयुक्त अकुनुरी नरेशतहसीलदार विजय पवारभारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारभाजप नेते प्रकाश देवतळेमहामंत्री रविंद्र गुरुनुलेसविता दंढारेतुषार सोममनपा गटनेते शेखर शेट्टीदशरथसिंह ठाकूरनामदेव डाहुलेनगरसेवक जितेश कुळमेथेनगरसेविका सरला कुळसंगेनगरसेवक दत्तू गवळीवैशाली मेश्राममाला पेंदामअशोक तुमरामडॉ. देव कन्नाकेजनार्धन गेडाममहिपाल मडावीकमलेश आश्रामगुंजन येरमेअविनाश मडावीचेतन मडावीड्रेफुल आश्रामअॅड. डॉ. मधुरकर कोटनाकेदीपक पेंदामविठ्ठल कुमरेविलास मसरामप्रमोद बोरीकरकृष्णा मसरामनिखिल कोडापेकेशव तिराणिकभाग्यश्री उईकेप्रणित कुळसंगे आदींची उपस्थिती होती.

 

दिनांक १९ व २० एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या या भव्य महोत्सवासाठी प्रशासनाने सर्व यंत्रणा सतर्क ठेवाव्यातअसे निर्देश आ. जोरगेवार यांनी दिले. कार्यक्रमस्थळी येणाऱ्या नागरिकांसाठी पाणीवीजस्वच्छतावाहतूक व सुरक्षा यांची काटेकोर व्यवस्था करावी आणि कोणतीही त्रुटी राहू नयेयावर त्यांनी विशेष भर दिला.

तसेचगर्दी नियंत्रणासाठी पोलीस बंदोबस्त वाढवून योग्य नियोजन करावेपार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करावी आणि आपत्कालीन सेवांसाठी आरोग्य विभाग सज्ज ठेवावाअशा सूचनाही त्यांनी दिल्या. महोत्सवाच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा गौरव होणार असल्याने कार्यक्रम भव्य व शिस्तबद्ध पार पडावाअसे त्यांनी स्पष्ट केले.

 

वनउत्पादने व हस्तकला प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या आदिवासी बांधवांना सर्वतोपरी मदत करावीमार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करावेत तसेच स्थानिक कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाने विशेष लक्ष द्यावे. समाजाच्या वतीने आलेल्या सूचनांची दखल घ्यावीअसेही आ. जोरगेवार यांनी सांगितले. Rani Hirai Mahotsav 2026

जिल्हाधिकाऱ्यांनी आ. जोरगेवार यांच्या सूचनांची दखल घेत सर्व विभागांना तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्याचे आश्वासन दिले. यावेळी आदिवासी संघटनांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मागण्यांमध्ये राजमाता हिराई शौर्य पुरस्कार देण्यात यावागोंडी पारंपरिक खाद्य महोत्सव आयोजित करावाहस्तकला व कलेची थेट प्रात्यक्षिके दाखविण्यात यावीतइतिहास व संस्कृतीवर आधारित स्पर्धा घेण्यात याव्यातयासह इतर मागण्या करण्यात आल्या.या बैठकीमुळे महोत्सवाचे नियोजन अधिक प्रभावी होऊन कार्यक्रम भव्य स्वरूपात पार पडेलअसा विश्वास व्यक्त करण्यात आला.

या बैठकीला प्रादेशिक राष्ट्रीय प्रधान जनजाती संघटनाअखिल भारतीय आदिवासी परिषदबिरसा सेनाआदिवासी टायगर सेनाअखिल भारतीय आदिवासी विकास परिषदबापूराव शेडमाके संघटनावीर बापूराव शेडमाके समितीवीर क्रांतिवीर शेडमाके स्मारक समितीआदिवासी काँग्रेस पार्टीबिरसा क्रांती दल यांच्यासह इतर संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

Leave a Comment

+