Shocking Family Dispute : कोरपना - कोरपना तालुक्यातील पिपरी मध्ये जावयाने सासूवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना १४ एप्रिलला मध्यरात्री १२.३० वाजता घडली, सासू अंगणात झोपत होती त्यावेळी हा हल्ला झाला याबाबत सासूने जावयाविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. (१५ हजार रुपयांसाठी मामा ने भाचा व सुनेला केली मारहाण)
६५ वर्षीय सिमन पत्रु बोढे असे जखमी सासूचे नाव असून आरोपीचे नाव प्रशांत सुधाकर झाडे आहे. बोढे यांच्या मुलीसोबत प्रशांत झाडे यांचे लग्न झाले होते, संगीता प्रशांत झाडे यांना दोन मुले आहे, जावई प्रशांत झाडे हा पत्नी सोबत नेहमी झगडा-भांडण करून तिला त्रास देत असल्याने मुलगी संगीता हि मागील १ वर्षांपासून आई सुमन बोढे यांच्याजवळ राहते.
संगीता चे दोन्ही मुले राजुरा येथे हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण घेतात, मागील ६ महिन्यापासून जावई प्रशांत झाडे हा घर जावई म्हणून सासू व पत्नीकडे रहायला आला होता. यादरम्यान तो मजुरीचे काम करीत होता. १३ एप्रिल ला मुलगी संगीता हि आपल्या मुलांना भेटण्यासाठी राजुरा मध्ये गेली होती. उशीर झाल्याने ती मुलांकडे मुक्कामी राहली.
तत्पूर्वी सकाळी जावई झाडे हा दारू पिऊन घरी आला, आधी व नंतर घरी दारू पिल्याने सासूने त्याला दारू का पिता म्हणून हटकले, यावर जावयाने सासूला शिवीगाळ केली. रात्री जेवण झाल्यावर सासू घराबाहेर अंगणामध्ये बाजेवर झोपली असताना जावयाने अंगावरील पांघरून ओढलं तुला आता मारतो म्हणत रागाच्या भरात बाजूला असलेल्या पावशीने सासूच्या मानेवर व दोन्ही हातावर वार करीत जखमी केले. सासूने आरडाओरडा केल्यावर जावई गावात पळून गेला.
याप्रकरणी सासूने जावयाविरुद्ध कोरपना पोलीस स्टेशनमध्ये जावई प्रशांत झाडे विरोधात गुन्हा दाखल केला, पोलिसांनी प्रशांत झाडे विरुद्ध कलम ३५२ व ११८ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Comment