Ballarpur Ganja Case : बल्लारपूर - चंद्रपूर जिल्ह्यात नशाखोरी करीत युवक गुन्हेगारी कृत्य करीत आहे, यावर आळा बसावा याकरिता चंद्रपूर पोलीस कारवाई मोहीम राबवित आहे, १७ एप्रिलला रात्री बल्लारपूर शहरात पोलिसांनी गांजा सेवन करताना अटक केली. आरोपींवर एनडीपीएस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. (चंद्रपुरात अल्पवयीन गुन्हेगारीचा भस्मासुर, ऑनलाईन मागवले शस्त्र)
१७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता गस्तीवर असताना पोलिसांना मालधक्का रेल्वे परिसरातील पडीत क्वार्टर मध्ये ३ इसम गांजा चे सेवन करीत असताना आढळले, पोलिसांना बघून ते इसम पळण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी घेराव टाकत आरोपीना अटक केली.
यावेळी २७ वृषीय अरबाज अली आसिफ अली राहणार बुद्धनगर वॉर्ड, ४० वर्षीय जमीर खान बशीर खान पठाण साईबाबा वॉर्ड व ६१ वर्षीय महेश तुळशीराम बुरडकर राहणार राणी लक्ष्मी वॉर्ड हे तिघेही झिंगलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आले, यांना ताब्यात घेत त्यांच्याजवळील चिलम व लायटर जप्त करण्यात आले.
सदरची कारवाई पोउपनि अभिषेक जंगमवार, खंडेराव माने, लखन चव्हाण व गुरु शिंदे यांनी केली.
Leave a Comment