Chandrapur Crime News : चंद्रपूर - शहरातील भिवापूर प्रभागातील भंगाराम मंदिर जवळील कांबळे यांच्या घरी २९ मार्चला अज्ञाताने घरात प्रवेश करीत सोन्या-चांदीचे दागिने सह रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजारांचा ऐवज लांबविला. याबाबत शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. (घुग्गुस शहरात अवैध सुगंधित तंबाखू जप्त)
शहरातील भिवापूर प्रभाग भंगाराम मंदिर लक्ष्मी नगर मध्ये राहणाऱ्या ६७ वर्षीय स्वर्णा साईनाथ कांबळे या २९ मार्चला दुपारी १२ वाजताच्या सुमारास तेरावी साठी तिरुमला हॉल मध्ये गेली होती, घरून निघताना त्यांनी घराच्या दाराला कुलूप लावले होते. स्वर्णा यांचे पती दवाखान्यात गेले होते, सायंकाळी ते परत आले असता दरवाज्याचे कुलूप तुटले होते, त्यांनी पत्नी स्वर्णा ला कॉल करून सांगितले कि घराला कुलूप लावले नव्हते का? कुलूप तुटले आहे तू लवकर घरी ये असे म्हटले.
स्वर्णा या तात्काळ घरी पोहोचल्या, घरातील सामान अस्तव्यस्त पडले होते, घरातील २ कपात फोडलेले होते, कपाटाच्या लॉकर मधून सोन्या-चांदीचे दागिने सह रोख रक्कम असा एकूण १ लाख ४० हजाराचा मुद्देमाल अज्ञाताने चोरून नेला.
भर दिवसा लक्ष्मी नगर भागात अज्ञाताने घरफोडी केल्याने परिसरात चांगलीच दहशत निर्माण झाली आहे, याबाबत स्वर्णा कांबळे यांनी शहर पोलिसात याप्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३३३ (३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
Leave a Comment