Durgapur Chandrapur Murder Case : चंद्रपूर (दुर्गापूर) - शहरातील दुर्गापूर कोयना गेट समोर २ एप्रिल ला दुपारच्या सुमारास यश फाले या युवकाची हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली. या हत्येमागे चारित्र्याच्या संशयावरून सुरु झालेला वाद असल्याची माहिती दुर्गापूर पोलिसांनी दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून यामध्ये पुन्हा २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (आमदार जोरगेवार यांच्या साधेपणाची चर्चा)
प्रफुल चिमणकर असे आरोपीचे नाव आहे, प्रफुल हा पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत असल्याने दोघे विभक्त राहत होते, चारित्र्यावर संशयामुळे दोघांमध्ये सतत वाद व्हायचे या कारणावरून मागील वर्षभरापासून प्रफुल पत्नीपासून विभक्त राहत होता. १ एप्रिल रोजी प्रफुल ची पत्नी घरी आली, मला तुमच्या सोबत रहायचे आहे, असे म्हणत ती विनवणी करू लागली, तुझा त्या फाले सोबत संबंध आहे, तुला मी ठेवणार नाही असे सांगत पत्नीला हाकलून लावले.
२ एप्रिल ला यश फाले व त्याचे दोन मित्र अंशुल रायपुरे व अभि रायपुरे हे प्रफुल च्या नास्ता सेंटरवर आले, तिघांनी लस्सी पिली, काही वेळाने यश फाले ने तुझ्या पत्नीसोबत माझ्या वडिलांचे संबंध आहे म्हणून तू पत्नीसोबत वाद करतो, माझ्या वडिलांचे नाव का जोडतो असे विचारले असता दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला, वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी यश च्या मित्रांनी प्रफुल च्या डोक्यावर काचेचे ग्लास फोडले, वाद वाढत असल्याचे बघत प्रफुल ने बचावासाठी बर्फ फोडणाऱ्या चाकूने यश च्या पोटावर वार केला. यश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी तात्काळ यश ला सामान्य रुग्णालयात हलविले मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी प्रफुल वर हत्येचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणात यश च्या मित्रांवर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशी माहिती परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक गौरव कायंदेपाटील यांनी दिली आहे.
Leave a Comment