चंद्रपूर: नाना-नाणी पार्कजवळ रेल्वे रुळाशेजारी अनोळखी मृतदेह, शहरात खळबळ

May 02, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - शहरातील नाना-नाणी पार्कजवळील रेल्वे रुळाच्या बाजूला एका व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने चांगलीच खळबळ उडाली, त्या व्यक्तीची हत्या झाली अशी चर्चा वाऱ्यासारखी शहरात पसरली मात्र पोलिसांनी घटनास्थळी पोहचत प्रत्यक्ष पाहणी केली, सदर व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला असावा असा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला. (प्लॉट साठी पैसे काढले मात्र भरदिवसा एकाने डिक्कीतून पैसे लंपास केले)

 

चंद्रपुरातील नाना-नाणी पार्क जवळ सकाळी नागरिक फिरायला जातात, यावेळी नागरिकांना एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, नागरिकांनी याबाबत चंद्रपूर शहर पोलिसांना माहिती दिली, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सदर व्यक्ती हा वेडसर असून तो अष्टभुजा, रयतवारी व महाकाली परिसरात फिरत असायचा, त्याच नाव कुणाला माहित नाही.

 

मृतदेहावर रक्ताचे डाग व चेहऱ्याला माती लागली आहे, नागरिकांना मृतदेह दिसल्यावर त्या इसमाचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्ती करीत खुनाची माहिती वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी परिसर व मृतदेहाची पाहणी केल्यावर वेडसर व्यक्तीचा मृत्यू हा उष्माघाताने होऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला असून चौकशी नंतर मृत्यूमागील कारण कळू शकणार अशी माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास शहर पोलीस करीत आहे. 

Leave a Comment

+