Chandrapur District Collector : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच महिला जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारलेल्या मा.वसुमना पंत यांचे आज चंद्रपूर शहर (जिल्हा )महिला कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षा तथा नगरसेविका सौ. चंदाताई वैरागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. (चंद्रपूर कांग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची दिनेश चोखारे यांचे नाव आघाडीवर)
स्वागत पार पडल्यानंतर विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली, त्यामध्ये प्रामुख्याने केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी वृद्धापकाळ, विकलांग, इंदिरा गांधी विधवा राष्ट्रीय योजनाची NSAP या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी होतं नसल्याने एक वर्षांपासून अनेक गरजू लाभार्थी चे अनुदान थकीत आहे. या करीता आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करण्यात यावी.
यासह जिल्ह्यात महिलांसाठी विशेष उपक्रम राबविण्यासाठी सहकार्य करणे इत्यादी विषयावर चर्चा करून निवेदन दिले. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ.सुनिताताई लोढिया,नगरसेविका वैशालीताई चंदनखेडे,श्रीमती करुणाताई चालखुरे,सौ.करिश्मा जंगम, सौ.वनश्रीताई मेश्राम,सोफियाजी तंवगंर,सर्व नगरसेविका सोबतच महिला काँग्रेस पदाधिकारी ऍड प्रीती शहा,श्रीमती अर्चनाताई ठाकरे सौ.आरतीताई खनके,सौअनिताताई बोबडे,यांची उपस्थिती होती.
Leave a Comment