Chandrapur Heat Wave । चंद्रपूरकरांनो सावधान! स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनाने दिल्या खास टिप्स

April 19, 2026 by Prakash Hande

Chandrapur Heat Wave  today : चंद्रपूर : भारतीय हवामान विभागाकडून आगामी काळात विदर्भातविशेष करून चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या कालावधीत काही ठिकाणी उष्णतेची लाट (Heat Wave) येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने उष्णतेच्या काळात नागरिकांनी सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.  उष्णतेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नयेयासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी. (चंद्रपुरातील तापमान वाढलं, जिल्हाधिकारी पंत यांचा महत्वाचा निर्णय)

 

1) तीव्र उन्हात विशेषतः दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान बाहेर पडणे टाळावे. 2) पुरेसे पाणी पित राहावे. तहान लागली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पाणी पिण्याची सवय ठेवावी. 3) घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्रीटोपी तसेच पांढरा शेला / दुपट्टा वापरावा. 4) सूर्यप्रकाशापासून बचावासाठीघरातील पडदे व झडपा वापराव्यात. 5) हलकेपातळसच्छिद्र व पांढऱ्या रंगाचे सूती / खादीचे कपडे वापरावेत. 6) प्रवास करताना किंवा कामाच्या ठिकाणी मुबलक पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.

 

7) शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएसलिंबूपाणीताकलस्सी इ. द्रवपदार्थ घ्यावेत. 8) घर थंड ठेवण्यासाठी पडदेशटर व सनशेडचा वापर करावा तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. 9) घरामध्ये कुलरपंखे किंवा वातानुकूलन (AC) यांचा योग्य वापर करावा. 10) कामगारांना सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळण्यासाठी सूचना द्याव्यात. 11) गरोदर महिलावयोवृद्धआजारी व्यक्ती व लहान मुले यांची विशेष काळजी घ्यावी. 12) शिळे अन्न खाणे टाळावे. 13) उन्हात काम करताना चेहरा व डोके ओल्या कापडाने झाकावे. 14) शक्यतो दुपारी 12 ते 4 या कालावधीत श्रमाची कामे टाळावीत. 15) चक्कर येणे किंवा अस्वस्थ वाटल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 16) पाळीव प्राणी व गुरेढोरे यांना सावलीत ठेवून त्यांना पुरेसे पाणी द्यावे. 17) उच्च प्रथिनयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. 18) दुपारच्या वेळेस मद्यचहाकॉफी व कार्बोनेटेड शीतपेये पिणे टाळावे.   

 

उष्माघात झालेल्या व्यक्तीस तात्काळ जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू  करावा. नागरिकांनी वरील सूचनांचे पालन करून स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावीअसे आवाहन जिल्हा प्रशासनचंद्रपूर   यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Comment

+