Chandrapur Updates । चंद्रपूरमधील 'या' भागात रात्री उशिरापर्यंत चालतोय मद्यपींचा धिंगाणा, "कारवाई करा नाहीतर रस्ता रोको!" मनोज पॉल यांचा इशारा

April 19, 2026 by Prakash Hande

Latest Chandrapur Updates : चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्यावर नियमबाह्य दारू दुकानांना परवानगी देण्यात आल्याने नागरिकांना यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. शहरातील बंगाली कॅम्प चौक परिसरात वाईन शॉप, बिअर बार व आता बिर्याणी शॉप सुरु झाल्याने वाहतुकीचा मोठा खोळंबा होत असल्याने भाजप महामंत्री मनोज पॉल यांनी या संबंधात जिल्हाधिकारी पंत यांना निवेदन दिले आहे. (तापमान वाढतेय, शाळांना सुट्टी जाहीर करा)

 

बंगाली कॅम्प चौकातून मूल व बल्लारपूर शहराकडे जाणारे महामार्ग जोडल्या गेले आहे, मात्र चौकातच हेम वाईन शॉप दारूबंदी ह्टल्यावर सुरु झाले त्यामुळे मद्यपी मुळे या वर्दळीच्या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होत होता, प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वकी दुर्लक्ष केल्याने आता बिअर बार व २ बिर्याणी सेंटर सुरु झाल्याने मद्यपी यांचे वाहन रस्त्यावर उभी राहतात. इतकेच नव्हे तर सदर दुकाने रात्री १२.३० वाजेपर्यंत सुरूच असतात. विशेष बाब म्हणजे मद्यपीना वाईन शॉप मध्येच पाण्याची सोया उपलब्ध करून दिले जात आहे.

 

या समस्येवर अनेकदा निवेदने संबंधित विभागाकडे देण्यात आली मात्र कारवाई काही झाली नाही, उलट या मद्यपींच्या वाहनाने या चौकात अपघात झाले, सदर अपघातात महिलेचा जीव गेला तर एक तरुण गंभीर रित्या जखमी झाला होता. त्यानंतरही राज्य उत्पादन शुल्क विभाग असो कि मनपा याकडे दुर्लक्ष करीत आहे.

 

या समस्येचा कायमस्वरूपी तोडगा निघावा याकरिता भाजप महामंत्री मनोज पॉल यांनी जिल्हाधिकारी पंत जवळ निवेदन दिले, जर समस्या सुटली नाहीतर परिसरातीळ नागरिकांसह रस्ता रोको आंदोलन करणार असा इशारा पॉल यांनी यावेळी दिला. 

Leave a Comment

+