CM Relief Fund Online । ८ तासांत वैद्यकीय मदतीची हमी; मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा असा घ्या लाभ

April 13, 2026 by Prakash Hande

CM Relief Fund Online : मुंबई / चंद्रपूर : राज्यातील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना उपचारासाठी आर्थिक सहाय्य अधिक वेगात मिळणार आहेमुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्यावत ऑनलाईन प्रणाली सुरू होणार आहेया प्रणालीमुळे अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहे.  (चंद्रपुरात शेतकऱ्यांचे सामूहिक विषप्राशन)

 

विशेष म्हणजे आता रुग्णाऐवजी थेट कक्षाशी संलग्न असणाऱ्या रुग्णालयामार्फत अर्ज सादर होणार आहेतत्यामुळे रुग्णाला कोणत्याही प्रकारचा अर्ज भरावा लागणार नाहीत्यामुळे  उपचार प्रक्रियेला गती मिळणार आहेया प्रणालीचे येत्या काही दिवसातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाकडून देण्यात आली आहे.

 

गेल्या काही वर्षभरापासून मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षामध्ये नाविन्यपूर्ण रुग्णस्नेही बदल करण्याचे काम सुरु आहेत्याचाच एक भाग मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवी ऑनलाईन प्रणाली असणार आहे.  रुग्णाने रुग्णालयात सर्व रीतसर कागदपत्रे दिल्यानंतर रुग्णालय प्रशासन त्याचा अर्ज मुख्यमंत्री सहायता निधी कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविणार आहेत्या ठिकाणी नियमानुसार सर्व कागदपत्रे असल्यास अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन 8 तासांत पूर्ण होणार आहेयामुळे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाला मोठा दिलासा मिळणार आहे.  तसेचगेल्या आर्थिक वर्षात 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत राज्यातील तब्बल 40 हजार 776 रुग्णांना 333 कोटी लक्ष 81 हजार 500 रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे. CM Assistance Portal

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे कक्षप्रमुख रामेश्वर नाईक म्हणाले कीरुग्णांना वेळेत उपचार मिळावेतयासाठी ही ऑनलाईन प्रणाली विकसित करण्यात येत आहेयामुळे आता अर्ज मंजुरीची प्रक्रिया जलद होऊन रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन प्रणालीचे अधिकृत उद्घाटन लवकरच होणार असूनत्यानंतर राज्यभरात ती प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेअधिक माहितीसाठी गरजू रूग्णांनी 1800 123 2211 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

Leave a Comment

+