Direct Interview Placement Drive : चंद्रपूर - जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध व्हावी, या हेतूने दुस-या व चवथ्या शुक्रवारी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन चंद्रपूर येथे प्लेसमेंट ड्राईव्ह आयोजीत आहे. (जिल्हाधिकारी पंत यांची गॅस गोदामात धडक)
जिल्ह्यातील 10 वी, 12 वी, आय.टी.आय. पदविका, पदवी इत्यादी उमेदवारांना विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, जिल्ह्यातील नामांकीत उद्योजकांचा थेट नोकरी इच्छुक उमेदवारांशी संपर्क करण्याच्या हेतूने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राचे तसेच रिझ्यूमच्या प्रतीसह (कमीत कमी तीन प्रती) उपस्थित राहावे.
तरी अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172 – 252295 यावर संपर्क करावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त उद्योजकांनी प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होण्याकरीता www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी तसेच रिक्त पदे अधिसूचीत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, यांनी केले आहे.
1 Comments
एवढ शिक्षण घेऊन काम काय मिळते, कंपनी मध्ये मोलमजुरी, या प्रकरणाला नोकरी नाही फक्त आणि फक्त मजुरी म्हणते, लोकांना बेरोजगारी दूर करण्याचे आश्वासन देऊन स्वतःचे उद्योग चालू करत आहे राजकारणी नेता लोक..... मग तिकडे काही पण होऊ दे किती ही प्रदूषण होऊ दे, गावाकडचे लोक मारू दे, गाव वाले पण खुश आमचं वावर गेल एम आय डी सी मध्ये आता रोजगार मिळणार गावचा विकास होणार.... फक्त उद्योग होणार मंडळी, ते पण मोठ मोठ्या उद्योगपतींचे आणि राजकारणी नेत्यांचे. मूर्ख कोण आपणच लोक...... मी तर चुकूनही या ठिकाणी जाणार नाही, जागे व्हा मंडळी 🙏