135th Jayanti । "आरक्षणामुळेच मी इथवर पोहोचलो!" पालकमंत्र्यांनी जयंती दिनी व्यक्त केली मोठी कृतज्ञता

April 14, 2026 by Prakash Hande

Dr Ambedkar 135th Jayanti : चंद्रपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी चंद्रपूर शहरातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. (भावाच्या लग्नात बहिणीचा मृत्यू)

 

यावेळी महापौर संगिता खांडेकरजिल्हाधिकारी वसुमना पंतमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहपोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शनमनपा आयुक्त अकुनुरी नरेशउपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्रामसहायक आयुक्त समाजकल्याण विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रभातफेरीला पालकमंत्री डॉ. वुईके यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलतांना पालकमंत्री डॉ. वुईके म्हणालेआजचा दिवस केवळ जयंती उत्सव नाही तर डॉ. आंबेडकरांचा संघर्ष तसेच त्यांच्या विचारांचे आणि कार्याचे स्मरण करण्याचा दिवस आहे. संपूर्ण जगात डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. भारतीय संविधानामुळेच सर्व नागरिकांना समान हक्कन्यायसमताबंधुता यांच्यासोबतच मुलभुत अधिकार आणि कर्तव्ये मिळाली आहेत. त्यांनी दिलेल्या आरक्षणामुळे आज मी येथे आपल्यासमोर उभा आहे. राज्य शासनाने आरक्षण वर्गीकरणाचा विषय जनतेच्या चर्चेसाठी ठेवला असून त्याला मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर नक्कीच सकारात्मक निर्णय शासन घेईलअसेही त्यांनी सांगितले.

 

आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणालेजयंती केवळ एक दिवस नाही तर 365 दिवस  योग्य कृती करणेहे डॉ. आंबेडकर यांना खरे अभिवादन राहील. त्यांच्या विचारांचे प्रत्येकाने स्मरण करावे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लंडन येथील वास्तुला स्मारक बनविण्याचे सौभाग्य मला मिळाले. चंद्रपूर हा डॉ. आंबेडकरांच्या विचारावर उत्तम काम करणारा जिल्हा असावाअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आमदार किशोर जोरगेवार म्हणाले140 कोटीच्या जनतेला संविधानाने एकसंघ ठेवले आहे. आज मानवतेचा संकल्प करण्याचा दिवस आहे. येथील दीक्षाभूमीच्या विकासासाठी 100 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून यापैकी 57 कोटी मंजूर झाले आहे. उर्वरीत निधी तात्काळ मंजूर करावाअशी मागणी त्यांनी केली. Ashok Uike Chandrapur News

यावेळी महापौर संगिता खांडेकरजिल्हाधिकारी वसुमना पंतमाजी मंत्री हंसराज अहीरमुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंहमनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सुध्दा मनोगत व्यक्त केले.

Leave a Comment

+