First Solar Highmast । चंद्रपुरात कोणत्या प्रभागात लागले पहिले सोलर हायमास्ट? आमदार अडबालेंच्या हस्ते उद्घाटन

April 12, 2026 by Prakash Hande

First Solar Highmast Chandrapur : चंद्रपूर : आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकारातून चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीतील माळी समाज सभागृह, बालाजी वॉर्ड चंद्रपूर समोरील ओपन स्पेसमध्ये नगर विकास निधीअंतर्गत पहिले सोलर हायमास्ट बसविण्यात आले आहे. (चंद्रपुरात सूर्य कोपला, कांग्रेसच्या नगरसेविकेने सुरु केली पाणपोई)



क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून ११ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी सोलर हायमास्टचे आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उचललेले हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे. सोलर हायमास्टमुळे परिसरात उजेडाची उत्तम सोय होणार असून वीज बचतीसह पर्यावरणपूरक उपक्रमालाही चालना मिळणार आहे.



या उपक्रमामुळे नागरिकांना रात्रीच्या वेळी सुरक्षिततेची भावना निर्माण होणार असून, स्वच्छ व हरित उर्जेचा वापर वाढविण्यासही मदत होणार आहे.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुधाकर अडबाले सातत्याने प्रयत्नशील असून, अशाच नाविन्यपूर्ण कामांमधून चंद्रपूर शहर अधिक प्रगत व सुरक्षित करण्याचा त्यांचा संकल्प आहे. याबद्दल आमदार सुधाकर अडबाले यांचा समाज मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.



यावेळी उपमहापौर प्रशांतजी दानव, नगरसेवक नंदूजी नागरकर, नगरसेविका सौ. संजीवनी वासेकर, माळी समाज सेवा मंडळचे अध्यक्ष राजू जी बनकर, सुनीलजी बनकर, अनिलजी बनकर, चंदाताई बनकर, आचलताई बनकर, सौरभ जी बनकर, पुष्पाताई बनकर, घनश्यामची वासेकर, रामदास दानव, राजू नागरकर, सचिन गावंडे व मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

+