Free Health Camp । धानोरा जिल्हा परिषद शाळेत भरला 'आरोग्याचा कुंभमेळा'; नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान

April 05, 2026 by Prakash Hande

Free Health Camp : चंद्रपूर - ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळावीही आजच्या काळाची अत्यंत मोठी गरज आहे. शहरांमध्ये वैद्यकीय सुविधा सहज उपलब्ध असतातपरंतु गावखेड्यातील अनेक कुटुंबांना अजूनही वेळेवर योग्य उपचार मिळत नाहीत. काही वेळा आर्थिक अडचणीतर काही वेळा माहितीचा अभाव यामुळे रुग्ण उपचारापासून वंचित राहतात. त्यामुळे हे आरोग्य शिबिर आयोजित केले असून प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे ही आमची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (भाजप आमदाराने मोडला ताडोबाचा नियम)

 

चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तसेच भारतीय जनता पार्टीचंद्रपूर तालुका व आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयसावंगी (मेघे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिर” आज (५ एप्रिल २०२६) रोजी जिल्हा परिषद शाळाधानोरा येथे उत्साहात पार पडले. सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत चाललेल्या या शिबिरात ग्रामीण भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यावेळी जवळपास दीड हजार नागरिकांनी आरोग्य सेवांचा लाभ घेतला. या कार्यक्रमात ते बोलत होते.

 

या कार्यक्रमाला डॉ. अभिषेक जोशीनानाजी शिंगणेभारतीय जनता पक्षाचे माजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारडॉ. पडगेलवारनामदेव डाहुलेविजय आगरेविनोद खेवलेसंजय तिवारीप्रदीप किरमेतेजा सिंगआशिष वाढईममता मोरेरंगराव पवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

यावेळी ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा सहज आणि मोफत उपलब्ध व्हावीहा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. आजही अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींमुळे योग्य वेळी उपचार घेता येत नाहीतत्यामुळे अशा शिबिरांच्या माध्यमातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

 

या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी व उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. विशेषतः हायड्रोसिलहर्नियागर्भाशयाचे आजारमोतीबिंदू यांसारख्या शस्त्रक्रिया मोफत करून देण्याचा निर्णय घेतला असूनत्यामुळे गरजू रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे. आपण सर्वांनी आपल्या आरोग्याबाबत सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. वेळोवेळी तपासणी करून आजार लवकर ओळखल्यास त्यावर सहज उपचार करता येतात. त्यामुळे अशा शिबिरांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावाअसे आवाहन त्यांनी केले.

 

भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. पुढील काळातही अशा लोकहितकारी उपक्रमांद्वारे नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हीच आपली खरी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले. या शिबिरामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या शिबिरात मेडिसिनन्यूरोसर्जरीस्त्रीरोगबालरोगअस्थिरोगत्वचारोगकान-नाक-घसा अशा विविध विभागांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून आवश्यक उपचार केले. रुग्णांची नोंदणीएक्स-रेरक्त व लघवी तपासणी तसेच औषधोपचार मोफत करण्यात आले. काही गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले असून निवडक शस्त्रक्रियाही मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Leave a Comment

+