Help for Divyang । चंद्रपूर - क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले 200 व्या जन्मशताब्दी वर्ष आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त "एक हात मदतीचा" जय शिव भीम समाज सेवा प्रतिष्ठान तर्फे दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या यश वेखंडेला रोजगारासाठी जयदीप रोडे यांच्या सहकार्यातून स्वयंरोजगारासाठी स्टॉलचे वाटप करण्यात आले. (बाबासाहेबांमुळे आजी मी इथपर्यंत पोहोचलो - पालकमंत्री उईके)
याप्रसंगी पप्पू देशमुख नगरसेवक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर, अजय बल्की नगरसेवक, सौ मनीषा विजय बोबडे नगरसेविका, सौ. प्रतीक्षा अक्षय येरगुडे, नगरसेविका महानगरपालिका चंद्रपूर, ज्येष्ठ व्हॉलिबॉल संघाचे कुक्कु भैय्या यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी पप्पू देशमुख यांनी आपल्या भाषणात बोलताना म्हटले की जयदीप रोडे यांनी पोलीस भरती सुरू असताना बाहेरगावुन विद्यार्थ्यांना जेवण आणि राहण्याची सोय केल्याबद्दल त्याचे आभार मानण्यात आले आणि यश वेखंडे ला लवकरच बॅटरी वरील सायकल देण्याचे सुद्धा कबुल केले.
मनदीप रोडे यांनी या प्रसंगी बोलतांना बचत गटाच्या गरजु महिलांना स्वयंरोजगारासाठी शिलाईमशीन चे वाटप सुद्धा देण्याचे कबुल केले, यावेळी नरेंद्र कुंभारे, बबनराव राजुरकर, डॉ किशोर जेणेकर, अतूल देऊळकर, अशोक रिंगणे प्रकाश सुर्वे, रवींद्र टोंगे, दीपक जेऊरकर, स्वामी कापरबोयना, मुन्ना ठाकूर, दिनेश भोंगडे, प्रमोद बोरीकर, निळकंठ पावडे, मनोज पवाडे,अभय बनपुरकर, संतोष बोरीकर,दिलीप झाडे, प्रवीण गुज्जनवार, रोशन भुजाडे, अविनाश बोरगमवार अक्षय येरगुडे, अमित दिकोंडवार, सचिन भिलकर अक्षय येरगुडे, प्रवीण चवरे, सिद्धार्थ वाघमारे, कृष्णकांत पोद्दार, बंडू वाडेकर,चेतन गज्जलावार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचलन संदीप ढोबळे यांनी केले तर आभार सुधाकर काकडे यांनी या प्रसंगी ज्येष्ठ व्हॉलिबॉल संघाचे सदस्य आणि जिल्हा स्टेडियम मधील मित्रमंडळी उपस्थिती होती.
Leave a Comment