Mla Kishor Jorgewar । कोणताही प्रोटोकॉल नाही, विशेष सोय नाही; महाकालीच्या दरबारात आमदार झाले सामान्य भक्त

April 02, 2026 by Prakash Hande

Mla Kishor Jorgewar : चंद्रपूर - चैत्र नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त महाकाली लंगर सेवा समितीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या अन्नछत्रात दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविकांना भोजनदान केले जात आहे. भक्ती, सेवा आणि समर्पणाचा सुंदर संगम असलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. (चंद्रपूरच्या महापौरांनी बेईमानी केली, भाजप नगरसेवकांचा आरोप)

 


  सामान्यतः “आमदार” म्हटले की गाड्यांचा ताफा, कार्यकर्त्यांची गर्दी आणि एक वेगळाच राजकीय रुबाब असे चित्र अनेकदा अनुभवायला मिळते. मात्र, या साच्यात न बसता आमदार किशोर जोरगेवार यांनी नेहमीच सर्वसामान्यांमध्ये मिसळत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याची प्रचिती पुन्हा एकदा अन्नछत्राच्या ठिकाणी पाहायला मिळाली.


   अन्नछत्राला भेट दिल्यानंतर त्यांनी कोणताही औपचारिकता न ठेवता थेट भाविकांसोबत पंगतीत बसून साधेपणाने भोजन केले. कोणताही दिखावा नाही, विशेष व्यवस्था नाही. फक्त सर्वसामान्य भक्तांप्रमाणेच शांतपणे पंगतीत बसलेले आमदार, हे दृश्य उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरले.


  यावेळी त्यांनी भाविकांशी संवाद साधत सेवा कार्याचे कौतुक केले. “भोजनदान हे श्रेष्ठ दान आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश पोहोचतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
  महाकाली लंगर सेवा समितीच्या कार्यकर्त्यांनीही त्यांच्या या साधेपणाचे स्वागत केले. “आमदार असूनही कोणताही अहंकार न बाळगता सर्वसामान्यांमध्ये मिसळून जाणे, हीच त्यांची खरी ओळख आहे,” असे त्यांनी सांगितले.
   एकूणच, पंगतीत बसून घेतलेले हे साधे भोजन केवळ एक कृती नसून जनतेशी जोडलेले नाते आणि जमिनीवर राहणारे नेतृत्व याचे प्रभावी उदाहरण ठरले आहे. त्यामुळेच आमदार किशोर जोरगेवार यांची ओळख ही केवळ राजकारणी म्हणून नव्हे, तर सर्वसामान्यांच्या मनातला आपला माणूस अशी अधिक दृढ होताना दिसत आहे.

Leave a Comment

+