Contractor Attack on Labourer : नागभीड - मिस्त्री काम करणाऱ्या व्यक्तीने काम केल्यावर ठेकेदाराला पैसे मागण्यासाठी गेला, ठेकेदार त्यावर चिडला आणि पैसे मागशील तर तुला मारून टाकतो असे म्हणत मिस्त्रींच्या डोक्यावर लाकडी दांड्याने वार केला, अचानक झालेल्या या हल्ल्यात मिस्त्री खाली कोसळला. याप्रकरणी ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. (पैश्याच्या वादावरून मामाने भाचा व सुनेला झोडपले)
म्हसली तालुका नागभीडमध्ये राहणारा ४० वर्षीय यशुदास माणिक चुधरी हा मिस्त्रीकाम काम करीत कुटुंबाचा गाडा चालवितो. ९ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता यशुदास हा ठेकेदार मंगेश सेलोटे ला कामाचे पैसे मागायला गेला होता, पैश्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. या भांडणात ठेकेदार सेलोटे याने यशुदास च्या डोक्यावर लाकडी दांड्याने जोरात प्रहार करीत त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
डोक्याला गंभीर मार लागल्याने यशुदास खाली कोसळला, नागरिकांनी त्याला गडचिरोली सामान्य रुग्णालयात नेण्यात आले, यशुदास ने घडलेल्या प्रकाराबाबत बहीण पूनम निरगुळे यांना माहिती दिली. निरगुळे यांनी भाऊ चुधरी ला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार नागभीड पोलीस स्टेशनमध्ये दिली,. पोलिसांनी सेलोटे वर कलम १०९ (१)अन्वये गुन्हा दाखल केला. यशुदास ची प्रकृती गंभीर असून त्याला पुढील उपचारासाठी नागपुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Leave a Comment