nice7777 app betting । चंद्रपुरात सुरु झाला Nice7777 चा गेम, बल्लारपुरात कारवाई

April 13, 2026 by Prakash Hande

nice7777 app betting : बल्लारपूर - आयपीएल क्रिकेटचा हंगाम सुरु झाल्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील सट्टेबाज सक्रिय झाले आहे, अनेक वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात सट्टेबाजी मोठ्या प्रमाणावर होत आहे पोलीस कारवाई करतात मात्र अजूनही या सट्टेबाजीचा म्होरक्या पोलिसांना मिळाला नाही, भविष्यातही मिळणार नाही. आयपीएल क्रिकेट मॅच च्या दरम्यान बल्लारपूर शहरातील शगुन लॉन जवळ २ आरोपीना सट्टेबाजी खेळताना ताब्यात घेतले असून याप्रकरणी ४० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. (मजुरीचे पैसे मागायला गेला, ठेकेदाराने दांडक्याने मारले)

 

१२ एप्रिलला रात्री ९.३० वाजताच्या दरम्यान आयपीएल वर सट्टा खेळल्या जात असल्याची माहिती बल्लारपूर पोलिसांना मिळाली, माहितीच्या आधारे पोलीस शगुन लॉन परिसरात पोहोचले असता त्याठिकाणी २ युवक मोबाईलद्वारे इतरांना लॉगिन आयडी व पासवर्ड देत पैश्यांचा जुगार लावण्यास प्रोत्साहित करीत होते.

 

पोलिसांनी त्या २ युवकांना ताब्यात घेतले, यामध्ये ३३ वर्षीय फिरोज फारुख मोहम्मद राहणार बालाजी वॉर्ड हनुमान मंदिर व ३० वर्षीय सय्यद सिकंदर सय्यद हमजा राहणार राणी लक्ष्मी वॉर्ड बल्लारपूर यांना अधिक विचारणा केली असता त्यांनी माहिती दिली कि टीव्हीवर आयपीएल क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण सुरु आहे, जे लोक आम्हाला कॉल करतात त्यांच्याकडून पैसे घेत ऑनलाईन सट्टा लावण्यासाठी त्यांना युझर आयडी व पासवर्ड देण्याचे काम करतो त्यांना आयडी दिल्यावर ते पैसे टाकून क्रिकेट सामन्यांवर पैसे लावतात.

 

आरोपी युवकांच्या मोबाईलची झडती घेतली असता त्यामध्ये Nice७७७७.fun, या वेबसाईटवर क्लिक केले असता त्यामध्ये लॉगिन केल्यावर live match असे अनेक मेनू दिसून आले, तर दुसऱ्या वेबसाईटवर सुद्धा असाच प्रकार पोलिसांना दिसला. पोलिसांनी मोबाईल वर त्या वेबसाईटचे स्क्रिनशॉट काढत पुरावा जमा केला. सदर वेबसाईट हि राजुरा शहरातील कार्तिक खामणकर यांच्या नावाने सुरु होती. पोलिसांनी या प्रकरणी तीन युवकांवर जुगार कायद्यांवये गुन्हा दाखल केला.  IPL Betting App

 

चंद्रपुरात मागील अनेक वर्षांपासून क्रिकेट सामन्यांवर सट्टेबाजी खेळण्यासाठी nice७७७७ या वेबसाईटचा वापर केला जात आहे, जिल्ह्यात राजकीय क्षेत्रातील नामवंत या सट्टेबाजीत गुंतले आहे. पोलीस यावर कारवाई करतात मात्र अजूनही ते यामागील म्होरक्याला अटक करू शकले नाही. आणि ते भविष्यात सुद्धा शक्य होणार नाही, कारण या सट्टेबाजांच्या नेटवर्कचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले आहे. सरकारने सट्टेबाजीच्या साईट ब्लॉक केल्या तरी रोज नवनवीन साईट्स या सट्टेबाजांसाठी सुरु होतात हे विशेष.

Leave a Comment

+