Relative Attack Couple : जिवती (चंद्रपूर) - कामानिमित्त मामा कडून १५ हजार रुपये उसने घेतले होते, मात्र शेतीला पीक कमी आल्याने पैसे देण्यास विलंब झाला, यावर पैसे का दिले नाही म्हणून मामाने पती-पत्नीला अक्षरशः झोडपून काढले. याप्रकरणी जिवती पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (डीजेवर नाचताना धक्का लागला, शस्त्राने युवकावर हल्ला)
वर्ष २०२५ मध्ये २७ वर्षीय रविना रामेश्वर राठोड यांनी कामानिमित्त पतीचे मामा विठ्ठल उत्तम जाधव जवळून १५ हजार रुपये उसने घेतले होते. शेतीला पीक कमी आल्याने पैसे परत करता आले नाही. ११ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता रामेश्वर राठोड हे बैलगाडी घेऊन शेतात जाण्यासाठी निघाले होते. त्यावेळी त्यांचे मामा विठ्ठल जाधव हे समोरून आले.
माझे पैसे कधी देतो अशी विचारणा जाधव यांनी केली, सध्या माझ्याजवळ पैसे नाही आले कि लगेच आपले पैसे परत करतो असे राठोड यांनी म्हटले. पण मामा जाधव यांनी काही न ऐकता शिवीगाळी करीत राठोड यांना मारहाण केली. पतीला कशाला मारत आहे अशी विचारणा रविना राठोड यांनी केली असता, त्या म्हणाल्या कि आम्ही तुमचे पैसे परत करतो. असे म्हटल्यावर मामी लताबाई जाधव यांनी रविना चे केस ओढत हाताबुक्क्यांनी मारहाण केली.
जर तुम्ही आमच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली तर तुम्हाला बघून घेतो अशी धमकी जाधव यांनी दिली. याबाबत राठोड यांनी विठल जाधव व त्यांच्या पत्नी लताबाई जाधव विरोधात जिवती पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोघांवर विविध कलमांव्ये गुन्हा दाखल केला.
Leave a Comment