Talodhi Crime । एकाच रात्री ३ दुकानांवर डल्ला; ४५ हजार लंपास! किराणा दुकानदाराच्या कष्टाच्या पैशावर डल्ला

April 01, 2026 by Prakash Hande

Talodhi Crime News : चंद्रपूर - जिल्ह्यातील तळोधी बाळापूर तालुका नागभीड मध्ये किराणा दुकानात ठेवलेले ४५ हजार रुपये रोख रक्कम अज्ञाताने चोरी केल्याची तक्रार तळोधी पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली. विशेष बाब म्हणजे एकाच दिवशी ३ दुकानात चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. (चंद्रपुरात भरदिवसा चोरी)

 

५० वर्षीय जगदेव मुरलीधर निकुरे यांचे घरी स्वतःचे रोडलगत त्रिमूर्ती किराणा व जनरल स्टोर्स चे दुकान आहे, ३० मार्च रोजी जगदेव यांनी काही दुकानांची उधारी रक्कम द्यायची असल्याने रात्री दुकानातील काउंटरमध्ये ४५ हजार रुपये ठेवले. रात्री ९ वाजता दुकान बंद करीत, सर्व कामे आटोपून निकुरे झोपी गेले.

 

३१ मार्चला सकाळी निकुरे यांच्या घरासमोर राहत असलेले महादेव गुरुनुले यांनी निकुरे यांना आवाज देत सांगितले कि तुमच्या दुकानाचे शटर उघडे आहे. त्यावेळी तात्काळ निकुरे यांनी दुकानात जाऊन बघितले असता शटर अर्धा वाकून होता, दुकानातील काउंटर ची तपासणी केल्यावर त्यामधील ४५ हजार रोख रक्कम आढळली नाही.

 

दुकानातील सामान जसेच्या तशी होती मात्र रोख रक्कम लांबविण्यात आली. काही वेळाने ओळखीच्या लोकांनी सांगितले कि जुना बसस्टोप बावनथडे कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा चोरी झाली. याबाबत निकुरे यांनी दुकान चालकासोबत माहिती घेतली असता दुकानाचे शटर वाकविले मात्र काही चोरी गेले नाही.

किराणा दुकानातील ४५ हजार रक्कम अज्ञाताने लांबवली असल्याने जगदेव निकुरे यांनी तळोधी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली, तळोधी बाळापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ३०५(A), ३३१ (४) व ६२ अन्वये गुन्हा दाखल केला.

Leave a Comment

+