चंद्रपूर :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवला आहे. भ्रष्टाचारमुक्त, भयमुक्त आणि विकासोन्मुख सरकार स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनाला बंगालच्या जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत भाजपला मोठ्या बहुमताने निवडून दिले. तृणमूल काँग्रेसच्या दादागिरी, अत्याचार आणि गुंडेशाहीच्या राजवटीला जनतेने लोकशाहीच्या माध्यमातून स्पष्ट नकार दिला आहे असे मत पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे पुर्व अध्यक्ष हंसराज अहीर यांनी स्थानिक बंगाली कॅम्प प्रभागात आयोजित जल्लोष, आतिशबाजी व लाडु वाटप कार्यक्रमात व्यक्त केले. (चंद्रपूर वाहतूक पोलीस निरीक्षकाची बदली करा)
यावेळी कार्यकर्त्यांमार्फत फटाक्यांची आतिशबाजी करण्यात आली. याप्रसंगी माजी उपमहापौर अनिल फुलझेले, सुभाश कासनगोट्टुवार, प्रकाष देवतळे, रघुवीर अहीर, शेखर शेट्टी, मनोज पाल, बलराम डोडाणी, नगरसेवक सारीका संदुरकर, राॅबीन बिस्वास , आशा देशमुख , भालचंद्र दानव, सरला कुळसंगेे, जितेष कुळमेथे, नितेष गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आता झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आसाम आणि पुदुचेरीमध्ये देखील दुसऱ्यांदा यश मिळवले आहे. प. बंगाल, आसाम च्या यशामुळे घुसखोरीता आळा बसेल, भयमुक्त वातावरणासोबत देशाला नवी दिशा मिळाली असल्याचेही अहीर म्हणाले.
’सुनेन्दु अधिकारी यांचे विशेष अभिनंदन’
भाजप नेते सुनेन्दु अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना त्यांच्या मतदारसंघात पराभूत करून मोठी कामगिरी केली आहे. प्रधानमंत्री, अमित शहा यांच्या नेतृत्वात सुनेन्दु अधिकारी यांनी प्रचाराची धुरा सांभाळून बंगालमध्ये भाजपची लाट निर्माण झाली.
पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये बांगलादेशी घुसखोर आणि अनधिकृत नागरिकांच्या मतदानामुळे ममता बॅनर्जी सरकार सत्तेवर आली होती, असे मतदारांनी स्पष्ट केले. भाजप सरकारने एसआयआर प्रक्रिया राबवून खऱ्या भारतीय मतदारांना ओळखले. या देशात रोहिंग्या किंवा बांगलादेशी घुसखोर मतदान करणार नाहीत, तर फक्त मूळ भारतीयच मतदान करतील, असा स्पष्ट संदेश जनतेने दिला असल्याचे अहीर यावेळी म्हणाले.
ममता सरकारच्या काळात हिंदू समाजावर अत्याचार, महिलांवर अत्याचार आणि घुसखोरांच्या संरक्षणामुळे अनेक हिंदू कुटुंबांना घर सोडावे लागले. बाहेरून आलेल्या बांगलादेषी, रोहिंग्या घुसखोरांना देशाबाहेर काढण्यासाठी भाजप सरकार कटिबद्ध आहे.
’राष्ट्रनायकांना आदरांजली’
या विजयामुळे डाॅ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या स्वप्नाची पूर्ती झाली आहे. १९४७ च्या पुर्व पाकिस्तान विभाजनात बंगाली हिंदूंच्या हितासाठी त्यांनी दिलेल्या संघर्षाला आज न्याय मिळाला आहे. तसेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या देशभक्तीच्या आदर्शाने प्रेरित होऊन बंगालने हा निर्णय घेतला आहे. याप्रसंगी भाजपामधील जेष्ठ कार्यकत्र्यांचा हंसराज अहीर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
’मोदी-शाह नेतृत्वाचे फळ’
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्या अथक मेहनतीचे हे फळ आहे. अमित शाह यांनी दिलेल्या “तुम मुझे वोट दो, मैं तुम्हें भाजपा भयमुक्त सरकार दूंगा” या नाऱ्याने जनतेला प्रेरित केले आणि आज भयमुक्त सरकार अस्तित्वात आले आहे. भाजपचे “सबका साथ, सबका विकास” हे ध्येयानुसार सर्व नागरिकांना, धर्म-जातीचा भेदभाव न करता विकास योजनांचा लाभ मिळत आहे. जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवून देशाला पूर्ण एकात्मता दिल्याप्रमाणे बंगालमध्येही विकास आणि सुरक्षा सुनिश्चित केली जाईल.
ममता बॅनर्जी सरकारने बंगालचे मोठे नुकसान केले असून, देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला होता. जनतेने हा धोका टाळला आहे. या ऐतिहासिक विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्ष सर्व कार्यकर्ते, समर्थक आणि बंगालच्या जनतेचे हंसराज अहिर यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमास विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर,शाम कनकम, स्वप्नील डुकरे, बलाई चक्रवर्ती, विश्वजित शहा , कबीर मंडल, गुरुपद मंडल, सुदीप सर, निखील कोडापे, सचिन संदुरकर, सुधीर कारंगल, विनोद शेरकी, गणेश गेडाम, विकास खटी, पुनम तिवारी, गौतम यादव, संजय खनके, श्रीकांत भोयर, राजू घरोटे, सतिष तायडे, सुबल मंडल, गोविंद मंडल, बंचिता चक्रवर्ती, खुखुरानी मंडल, सुजन शहा, पुरुशोत्तम राऊत यांचेसह अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Comment