चंद्रपूर - सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याकरिता अनुसूचित जमातीच्या (आदिवासी) प्रवेशपात्र विद्यार्थ्यांकडून इयत्ता 1 ली मध्ये प्रवेश घेण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या कार्यालयाकडून प्रवेशाकरीता 20 एप्रिल पासून प्रवेश अर्ज निःशुल्क वितरीत करण्यात येत असून संपूर्ण भरलेले अर्ज 21 मे 2026 पर्यंत स्वीकारले जातील. (चंद्रपुरात अमृत योजनेचा बट्ट्याबोळ, विक्रांत सहारे यांचं निवेदन)
प्रवेशासंबंधी अटी व शर्ती : 1) सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. विद्यार्थ्याने सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. प्रमाणपत्राची मूळ प्रत तपासणीसाठी सोबत आणावी. 2) जर विद्यार्थ्यांचे पालक दारिद्रय रेषेखालील असेल तर सक्षम प्राधिकारी यांनी निर्गमीत केलेले बी. पी. एल. प्रमाणपत्र जोडावे. 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाची वार्षिक उत्पनाची कमाल मर्यादा 1 लक्ष रुपये इतकी असावी. संबंधित पालकाने सक्षम अधिकारी यांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करावे. 4) शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे दिनांक १८ सप्टेंबर 2020 च्या शासन निर्णयाप्रमाणे असावे. 5) विद्यार्थ्यांचे पालक शासकीय/निमशासकीय नोकरदार नसावेत. तसे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल, खोटी माहिती सादर केल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल. 6) इयत्ता 1 ली मध्ये प्रवेशित झाल्यानंतर कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन इतर नामांकित निवासी शाळांमध्ये करण्यात येणार नाही. 7) प्रवेश दिल्यानंतर त्याच शाळेत शिक्षण घेणे बंधनकारक राहील. कुठल्या परिस्थितीत पालकांच्या व पाल्याच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. 8) कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याची वेळ आल्यास त्यांचे समायोजन एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्येच करण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे : 1) विद्यार्थ्यांचा जन्मतारखेचा दाखला, 2) विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, 3) या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे संमतीपत्रक व विद्यार्थ्यांचे पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, 4) विद्यार्थ्यांचे पालक आदिम जमाती, अंपग, विधवा, घटस्फोटित, निराधार, परित्यक्ता असल्यास अर्जासोबत तसा पुरावा जोडावा.
प्रवेश अर्ज खालील ठिकाणी निःशुल्क उपलब्ध आहेत : 1) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा स्टेडीयम मागे, सिव्हिल लाईन, चंद्रपुर, 2) प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर अधिनस्त असलेल्या सर्व शासकीय वसतिगृह, एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल, देवाडा.
Leave a Comment