चंद्रपूर: मंदिराची दानपेटी ते घरफोडी, ३ गुन्हे करणारा अट्टल चोरटा जाळ्यात

May 03, 2026 by Prakash Hande

चंद्रपूर - चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने ३ मे रोजी रेकॉर्डवरील घरफोडी गुन्ह्यातील आरोपीला अटक करीत एकूण १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

 

पोलीस स्टेशन मूल हद्दीत झालेल्या चोरी प्रकरणात दुर्गापुरातील अट्टल आरोपी अमोल इलमकर चे नाव समोर आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेने आरोपीची शोधमोहीम सुरु केली. आरोपी हाती लागताच गुन्हे शाखेने त्याची चौकशी केली असता आरोपीने सदर घरफोडी केल्याचे कबूल करीत तब्बल १०५ ग्राम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. (ऑटोमोबाइलच्या दुकानात पेट्रोल विक्री, पोलिसांची कारवाई)

 

यासह घुग्गुस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घरफोडी प्रकरणातील चोरी गेलेल्या चांदीच्या दागिन्यांपासून बनविलेली १ किलो ४११ ग्राम वजनाची लगड आरोपीने एका महिलेला दिली होती, पोलिसांनी चांदीची लगड महिलेपासून जप्त केली. आरोपीने यासह मुल पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका मंदिरातील दानपेटी फोडल्याचा गुन्हा कबूल केला. आरोपीकडून सोन्या - चांदीचे दागिने सह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण १७ लाख ७८ हजार २२६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकूण ३ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यास गुन्हे शाखेला यश मिळाले. पुढील कारवाईसाठी आरोपी इलमकरला मूल पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

 

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि बलराम झाडोकार, पोउपनि संतोष निंभोरकर, पोउपनि सर्वेश बेलसरे, पोउपनि सुनील गौरकार, पोलीस कर्मचारी रजनीकांत पुठ्ठावार, सचिन गुरनुले, संतोष येलपुलवार, गणेश मोहुर्ले, दिनेश अराडे, नितीन कुरेकार, नितीन साळवे, प्रमोद कोटनाके, सुरेंद्र महतो, निराशा तितरे, उषा लेडांगे, प्रफुल गारघाटे, शेखर माथनकर व अमोल सावे यांनी केली.     

 

Leave a Comment

+