सिंदेवाही: ऑटोमोबाइलच्या दुकानात अवैधरित्या पेट्रोल विक्री

May 03, 2026 by Prakash Hande

सिंदेवाही - शहरातील ऑटोमोबाइलच्या दुकानात अवैधरित्या पेट्रोल विक्री करणाऱ्यावर सिंदेवाही पोलिसांनी कारवाई केली आहे, याप्रकरणी पोलिसांनी एकूण ४० लिटर पेट्रोल जप्त केले आहे. काही दिवसांपूर्वी सिंदेवाही शहरात पेट्रोलचा  तुटवडा निर्माण झाला होता, अनेक पंपावर पेट्रोल नसल्याने काहींनी दुसऱ्या तालुक्यात जाऊन पेट्रोल वाहनात भरले होते, या आपत्तीवर काहींनी पैसे कमविण्याची संधी तयार केली असल्याचे या प्रकरणावरून दिसते. (वाहनाच्या डिक्कीतून उडविले २ लाख रुपये)

 

 सिंदेवाही शहरातील श्रीकृष्ण ऑटोमोबाईल मध्ये अवैधरित्या पेट्रोल विक्री सुरु असल्याची माहिती परंपर होताच पंचासह पोलीस ऑटोमोबाइलच्या दुकानात पोहोचले. शिवाजी चौकातील या दुकानाची झडती पोलिसांनी घेतली असता त्याठिकाणी एकूण ४० लिटर पेट्रोल प्लास्टिक च्या कॅन मध्ये आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी ऑटोमोबाईल चालक ४७ वर्षीय रामकृष्ण दादाजी अगळे वर कलम ३,७ जीवनावश्यक वस्तू कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला, याप्रकरणी एकूण ४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. सदर पेट्रोल हे ११० रुपये लिटर प्रमाणे विक्री करीत असल्याची माहिती आहे.

 

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वात पोलीस कर्मचारी दादाजी रामटेके, संजय जुगनाके यांनी केली.

Leave a Comment

+