वरोरा - मैत्री मध्ये मजाकीच्या गोष्टी झाल्या मात्र यामुळे एकाला राग आला आणि थेट थम्सअप ची बॉटल मित्राच्या डोक्यावर मारली, याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (कुरकुरे घ्यायला आला, लाखोंची चैन घेऊन पसार झाला)
२६ वर्षीय मयूर शंकर ढोरे माढेळी गावात शेती करतो, गावात लोकांच्या घराचे टाइल चे काम करण्याकरिता शिवम येटे हा युवक आला होता, वर्षभरापूर्वी शेखापूर धानोरा पुलावर मयूर ढोरे, सूरज देवतळे, शिवम मंगेकर व प्रवीम मंजुरकर हे गमतीच्या गोष्टी करीत असताना शिवम येटे त्याठिकाणी आला. त्यावेळी शुभम सोबत मयूर चा वाद झाला होता.
११ मे रोजी सायंकाळी ६ वाजता मयूर व सूरज हे दुचाकीने पेट्रोल भरण्याकरिता पंपावर गेले होते, पंपावर गर्दी असल्याने पान ठेल्यावर थांबले. काही वेळाने त्याठिकाणी संतोष मेश्राम व शिवम येटे हे दारू पिऊन आले, माझी मजाक करतो असे म्हणत शिवम मयूर जवळ आला, शिवम ने यावेळी शिवीगाळी करीत मयूर ला मारायला सुरुवात केली.
यावेळी शिवम ने मयूर च्या डोक्यावर थम्सअप ची बाटली फेकून मारली असता मयूर ने तिथून पळ काढला, मयूर तिथून पळाला मात्र काही अंतरावर तो धावत असताना खाली पडला, यावेळी मयूर ला दुखापत झाली. याबाबत मयूर ने वरोरा पोलीस स्टेशनमध्ये शिवम विरोधात तक्रार दाखल केली.
Leave a Comment