BJP Foundation Day । "भाजप ही केवळ संघटना नाही, तर मोठी चळवळ..." किशोर जोरगेवारांनी कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र

April 06, 2026 by Prakash Hande

BJP Foundation Day : चंद्रपूर - भारतीय जनता पार्टी ही केवळ एक राजकीय पक्ष नाहीतर ती राष्ट्रसेवाजनसेवा आणि विकासाच्या विचारधारेवर चालणारी एक मोठी चळवळ आहे. भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस हा केवळ एक औपचारिक कार्यक्रम नसूनतो आपल्या विचारसरणीचासंघर्षाचा आणि देशसेवेच्या अखंड प्रवासाचा स्मरणदिन असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. (१५६ नागरिकांच्या हाती कमळ, मुनगंटीवारांचा मास्टरस्ट्रोक)

 

            भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर च्या वतीने भारतीय जनता पार्टी ४६ वा स्थापना दिना निमित्त महानगर कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते विजय राउतमाजी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवारओबीसी नेते अशोक जिवतोडे,  नेते प्रकाश देवतळेबलराम डोडाणीमहामंत्री रविंद्र गुरुनुलेश्याम कनकममनोज पालमनपा गटनेते शेखर शेट्टीविधानसभा महिला अध्यक्ष वंदना हातगावकरदशरथसिंह ठाकुरमंडळ अध्यक्ष प्रदिप किरमे, रवी जोगीसुभाष अदमानेअॅड सारिका संदुरकरमहामंत्री नामदेव डाहुलेभारतीय जनता पार्टीच्या माजी महिला शहर अध्यक्षा तथा नगर सेविका सविता कांबळेनगर सेविका शितल गुरुनुलेपूष्पा उराडेआशिष मासिरकरनगर सेविका ज्योती जिवनेआशा देशमूखआदिं मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

 

            यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले किपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयच्या विचारातून प्रेरणा घेतसमाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवण्याचा संकल्प आपण केला आहे.आपल्या पक्षाने नेहमीच राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान दिले आहे. देशाच्या प्रगतीसाठीगरीबशेतकरीमहिलायुवा आणि वंचित घटकांच्या उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टीने सातत्याने काम केले आहे. आज देशाच्या प्रत्येक कोपर्यात विकासाची गंगा पोहोचत आहेहे आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे.

 

             भारतीय जनता पार्टीची खरी ताकद ही आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा खरा प्रतिनिधी आहे. आपण सर्वांनी निष्ठाप्रामाणिकपणा आणि सेवाभाव या तत्त्वांवर काम केले पाहिजे. जनतेशी सतत संपर्क ठेवून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणे हीच खरी जनसेवा आहे. आजचा दिवस आपल्याला आत्मपरीक्षण करण्याचाही आहे. आपण आतापर्यंत काय केलेपुढे काय करायचे आहेयाचा विचार करून अधिक जोमाने काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे. BJP Foundation Day Celebration

 

            चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातही आपण विकासाच्या अनेक कामांना गती दिली आहे. पायाभूत सुविधाआरोग्यशिक्षणरोजगार या सर्व क्षेत्रांत आपण सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत. कार्यकर्त्यांनी पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचहून नवीन कार्यकर्ते तयार करावे आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सक्रिय भूमिका निभावावी.

 भारतीय जनता पार्टी ही सबका साथसबका विकाससबका विश्वास या तत्त्वावर चालणारा पक्ष आहे. या विचारधारेचा प्रसार करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 

नितेश पाटील यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

 

भारतीय जनता पार्टीच्या वाढत्या प्रभावाचा प्रत्यय पुन्हा एकदा पाहायला मिळाला असूनविविध पक्षांतील तसेच सामाजिक क्षेत्रातील असंख्य कार्यकर्त्यांनी आज मोठ्या उत्साहात आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. नव्याने प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत जनसेवेसाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कीभारतीय जनता पार्टी ही देशातील सर्वात मोठी आणि विश्वासार्ह राजकीय संघटना बनली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीमुळे आणि विकासाभिमुख धोरणांमुळे विविध स्तरांवरील कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत आहेत.

या प्रवेशामुळे भारतीय जनता पार्टीचे संघटन अधिक मजबूत होणार असूनआगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला मोठे बळ मिळणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी पक्षाचा दुपट्टा टाकून सर्व नवीन कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

Leave a Comment

+